
M.Phil. Professor News: महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील एम.फिल. पदवी असलेले १,४२१ प्राध्यापक अखेर पदोन्नतीच्या मार्गावर आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) त्यांना NET किंवा SET पात्रता प्रमाणपत्रे दिली आहेत, ज्यामुळे त्यांना वरिष्ठ आणि निवड श्रेणीमध्ये पदोन्नती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.