
UGC New Guidelines : विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता विद्यार्थांना मल्टिपल कोर्स एन्ट्री-एक्झिट पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी आता देशातील सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये म्हणजे मॅनेजमेंट, लॉ आणि इंजिनिअरिंग महाविद्यालयात एकाचवेळी एकापेक्षा अधिक कोर्स करू शकणार आहेत. भविष्याच्या दृष्टीने हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक असाच आहे. नव्या गाईड लाईन्सनुसार सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना धोरण आखण्यास सांगण्यात आले आहे.
नव्या गाईडलाईन्सनुसार विद्यार्थांना आता एकाच वेळी दोन कोर्सचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. यूजीसीचा हा निर्णय 2022-2023 या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार आहे. त्यानुसार सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी धोरण आखावं असं स्पष्ट करण्यात आले आहे.
नव्या नियमांनुसार विद्यार्थी त्यांच्या सोईने वेगवेगळे कोर्स करु शकणार असून, सेमिस्टरनुसार ते वर्गात उपस्थित राहू शकणार आहेत. त्याशिवाय ऑफलाईन पद्धतीनेदेखील हे कोर्स करणे शक्य असून डिस्टन्स एज्युकेशनच्या माध्यमातून एकाच वेळी विद्यार्थी मल्टीपल कोर्सला प्रवेश घेऊ शकणार आहेत.