आज, 3 जानेवारी रोजी यूजीसी नेट परीक्षा आजपासून सुरुवात झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फ्रॉम भरला आहे. त्यांना ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. परीक्षा संदर्भात अधिक माहिती पाहू शकता..यूजीसी नेट 2024 परीक्षाराष्ट्रीय परीक्षा एजन्सी(एनटीए) आज, 3 जानेवारी रोजी UGC NET डिसेंबर 2024 सत्र परीक्षा आयोजित करत आहे. ही पहिली परीक्षा आहे आणि अंतिम परीक्षा 16 जानेवारी रोजी होईल.यूजीसी नेट परीक्षा 85 विषयांसाठी परीक्षा 3, 6, 7, 8, 9, 10, 15 आणि 16 जानेवारी रोजी घेतली जाईल. विद्यार्थ्यांनी परीक्षा साठी नोंदणी केली असल्यास, ते ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवरून UGC NET 2024 प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) ही परीक्षा देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर OMR (पेन आणि पेपर) पद्धतीने घेणार आहे. परीक्षा दररोज दोन शिफ्टमध्ये होईल. पहिली शिफ्ट सकाळी 9:00 ते 12:00 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3:00 ते 6:00 पर्यंत असेल..Top Job 2025 : 2025 मध्ये वाढेल नोकऱ्यांची मागणी; एआय, डेटा सायन्स आणि हेल्थकेअरच्या क्षेत्रांमध्ये संधी.यूजीसी नेट 2024 परीक्षा वेळ:आज होणाऱ्या विशिष्ट विषयांच्या परीक्षांचा तपशील खाली दिला आहे:शिफ्ट 1 (9:00 AM – 12:00 PM): पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन, एज्युकेशनशिफ्ट 2 (3:00 PM – 6:00 PM): अर्थशास्त्र आणि संबंधित शास्त्रे, म्युझिओलॉजी आणि संरक्षकता..UGC NET परीक्षा घेण्याचा मुख्य उद्देश: 1. ज्युनियर रिसर्च फेलोशिप पुरस्कार आणि सहाय्यक प्राध्यापक पदाच्या नियुक्तीसाठी2. सहाय्यक प्राध्यापक पदावर नियुक्ती आणि पीएचडी मध्ये प्रवेश3. पीएचडी मध्ये प्रवेश.यूजीसी नेट परीक्षाचे नियम आणि सूचना- विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्राची छापील प्रति, एक पासपोर्ट आकाराची छायाचित्र आणि एक वैध फोटो आयडी (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट) आणणे आवश्यक आहे.- वैयक्तिक स्टेशनरी, रफ शीट्स किंवा पेन परीक्षा केंद्रात आणता येणार नाहीत. हे साहित्य परीक्षा केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून दिले जाईल.- इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर, आणि खाद्यपदार्थ किंवा पेय पदार्थ घेणे बंद आहे.- विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन डेस्कवर 30 मिनिटे आधी पोहोचणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश पत्रावरील वेळेनुसारच दिला जाईल..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.