यूजीसी-नेट परीक्षा पुन्‍हा स्‍थगित; नवीन तारखांची घोषणा नाही

UGC-NET exam 2021
UGC-NET exam 2021 Google


नाशिक : सहाय्यक प्राध्यापकपदासाठी राष्ट्रीय स्‍तरावर होणाऱ्या यूजीसी-नेट परीक्षेचा (UGC-NET exam) वारंवार मुहूर्त हुकत आहे. वर्ष होत आले असताना, यूजीसी-नेट डिसेंबर २०२० सोबतच जून २०२१ सत्रातील परीक्षा अद्याप झालेल्‍या नाहीत. रविवार (ता. १७)पासून परीक्षा सुरू होणार होती. मात्र, ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय नॅशनल टेस्‍टिंग एजन्‍सीने घेतला आहे. अद्याप सुधारित तारखांची घोषणा झालेली नाही.

कोरोना महामारीमुळे अनेक परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. यात यूजीसी-नेट परीक्षेचाही समावेश आहे. यूजीसी नेट डिसेंबर २०२० ही परीक्षा कोरोना महामारीमुळे होऊ शकली नव्‍हती, तसेच जून २०२१ मध्ये नियोजित परीक्षाही झाली नव्‍हती. अशात या परीक्षा १७ ते २५ ऑक्‍टोबरदरम्‍यान घेतल्‍या जाणार असल्‍याचे जाहीर झाले होते. मात्र, या कालावधीत देशातील विविध भागांमध्ये अन्‍य महत्त्वाच्‍या परीक्षा असल्‍याने उमेदवारांनी या संदर्भात ‘एनटीए’ला कळविले होते. त्‍यानंतर एनटीएमार्फत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यूजीसी नेट डिसेंबर २०२० आणि जून २०२१ या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे स्‍पष्ट करण्यात आले आहे.

UGC-NET exam 2021
दिवाळी नंतर कोरोनाची तिसरी लाट? राजेश टोपेंचे विधान

सेटची उत्तरतालिका उपलब्‍ध

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या राज्‍यस्‍तरीय पात्रता परीक्षा विभागातर्फे २६ सप्‍टेंबरला महाराष्ट्र व गोव्‍यातील एकूण १५ शहरांमधील २२० परीक्षा केंद्रांवर पार पडली. या परीक्षेसाठी प्राथमिक उत्तरतालिका (आन्‍सर की) प्रसिद्ध केली आहे. तसेच सेट परीक्षेच्‍या प्रश्‍नपत्रिकेबाबत सूचना, तक्रारींसाठी विद्यापीठाचे संकेतस्‍थळ http://setexam.unipune.ac.in या लिंकवर ऑनलाइन अर्जाद्वारे पुरावा व शुल्‍कासह करता येणार आहे. त्‍यासाठी २८ ऑक्‍टोबरपर्यंत मुदत असेल.

UGC-NET exam 2021
Tata Punch चे कोणते व्हेरियंट बसेल तुमच्या बजेटमध्ये? वाचा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com