Tata Punch चे कोणते व्हेरियंट बसेल तुमच्या बजेटमध्ये? वाचा

Tata Punch
Tata PunchGoogle

टाटा मोटर्सने अखेर आपली स्वस्त मायक्रो एसयूव्ही टाटा पंच भारतीय बाजारात लाँच केली आहे. कंपनीने ही मायक्रो एसयूव्हीची किंमत ही फक्त 5.49 लाख रुपयांपासून सुरु होते. ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंगसह टाटा पंच या सेगमेंटमध्ये देशातील सर्वात सुरक्षित एसयूव्ही कार ठरली आहे. या एसयूव्हीला एकूण चार व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आले असून. ज्यांची किंमत 5.49 लाख ते 8.49 लाख रुपयांदरम्यान आहे. आज तुमच्या बजेटमध्ये कोणते व्हेरियंट बसेल आणि त्याचे फीचर्स काय असतील याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत .दरम्यान या कारची बुकींग ही 4 ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे.

Tata Punch Pure

टाटा पंच या मायक्रो एसयूव्हीचे हे बेस म्हणजेच एंट्री लेव्हल व्हेरियंट आहे आणि त्याची किंमत 5.49 लाख रुपये आहे. या कारमध्ये तुम्हाल स्टँडर्ड सेफ्टी फीचर्ससह इतर काही फीचर्स देखील देण्यात आली आहेत. जसे की

  • इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (EBD)

  • एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS)

  • डुअल फ्रंट एयरबैग

  • ISOFIX चाइल्ड सीट एंकर

  • स्टीयरिंग व्हीलसाठी टिल्ट एड्जेस्टमेंट

  • पावर्ड फ्रंट विंडो

  • सेंट्रल लॉकिंग

  • ब्रेक स्वे कंट्रोल

  • 15-इंच स्टील रिम्स

  • फ्लैट बॉटम स्टीयरिंग व्हील

रिदम पॅक जोडल्यानंतर ग्राहक स्टीयरिंग माऊंटेड कंट्रोल आणि स्टीरिओसह 4 स्पीकर्स देखील जोडू शकतात. हे एक बेस मॉडेल असल्याने, आपल्याला त्यात अनेक अडव्हांस फीचर्स मिळत नाहीत.

Tata Punch
Kia ने लॉंच केली सर्वात स्वस्त SUV ची स्पेशल एडिशन, पाहा किंमत

Tata Punch Adventure

टाटा पंचच्या Adventure ट्रिमची किंमत 6.39 लाख रुपये असून Pure या व्हेरियंटमध्ये देण्यात आलेल्या फीचर्स व्यतिरिक्त आणखी काही खास फीचर्स यामध्ये मिळतात जसे की,

  • स्टीयरिंग माउंटेड ऑडियो कंट्रोल

  • 4 इंच का इंफोटेनमेंट सिस्टम

  • 4 स्पीकर

  • फ्लिप असलेली रिमोट की फोब

  • ORVMs साठी इलेक्ट्रॉनिक एड्जेस्टेबल

  • सर्व 4 दरवाजांना पावर विंडो

  • इल्यूमिनेटेड ग्लोवबॉक्स

  • डे-नाइट आईआरवीएम

  • फॉलो होम हेडलाइट्स

  • व्हील कवर सोबतच 15 इंचाचे रिम

या व्यतिरिक्त ग्राहक रिदम ऑप्शनल पॅक घेऊन त्यात इतर काही फीचर्स देखील जोडू शकतात. ज्यात रिव्हर्सिंग कॅमेरा, 7-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्ले कनेक्टिव्हिटी सारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

Tata Punch Accomplished

टाटा पंचचा Accomplished व्हेरियंमध्ये तुम्हाला खूप काही मिळते. या व्हेरियंटची किंमत 7.29 लाख रुपये असून अॅडव्हेंचर व्हेरियंटमध्ये दिलेल्या फीचर्स व्यतिरिक्त काही अतिरिक्त फिचर्स देखील यात उपलब्ध आहेत. परफॉर्मंस सोबतच चांगले फीचर्स देखील हवे असल्यास हे व्हेरियंट बेस्ट ऑप्शन आहे.

  • हर्मनची प्रीमियम साउंड सिस्टम

  • 7 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम

  • 4-स्पीकर प्लस 2-ट्वीटर

  • रियर व्हयूव कॅमेरा

  • कीलेस एंट्री आणि गो

  • क्रूज कंट्रोल

  • ट्रॅक्शन मोड (फक्त AMT साठी)

  • ड्रायव्हर सीट एडजस्टमेंट फीचर

  • फॉगलाईट

या व्हेरियंटमध्ये, कंपनी डॅझल ऑप्शनल पॅक देखील देत आहे, ज्यामध्ये ग्राहक 16-इंच डायमंड कट अॅलॉय व्हील्ससह एलईडी डे टाईम रनिंग लाइट्स आणि प्रोजेक्टर हेडलाइट सारख्या फीचर्सचा लाभ घेऊ शकतात.

Tata Punch
दिवाळीत नवीन कार घेताय? 'या' महत्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात

Tata Punch Creative

टाटा पंच या मायक्रो एसयूव्हीचे हे टॉप व्हेरियंट आहे आणि जवळजवळ सर्व अडव्हांस फीचर्स या कारमध्ये देण्यात आली आहेत. या व्हेरियंटची किंमत 8.49 लाख रुपये आहे. Accomplished व्हेरियंटमध्ये दिलेल्या फीचर्स व्यतिरिक्त, यात बरेच काही आहे, जे या एसयीव्हीला आणखी खास बनवते.

  • एलईडी डे टाईम रनिंग लाइट्स

  • प्रोजेक्टर हेडलाइट असेंब्ली

  • ऑटोमॅटीक हेडलाइट्स

  • रेन सेन्सिंग वाइपर

  • पडल लाईट

  • कूल्ड ग्लोव्हबॉक्स

  • रियर वाइपर आणि वॉशर

  • ऑटोमॅटीक क्लायमेट कंट्रोल

  • पॉवर फोल्डिंग ORVM चे

  • 7 इंच पार्ट डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर

  • रियर सीट आर्मरेस्ट

  • 16 इंच अलॉय व्हिल्स

या व्हेरियंटसह, ग्राहक कंपनीचा एक्सक्लुझिव्ह आयआरए पॅक देखील जोडू शकतात, ज्यात काही विशेष फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीने या एसयूव्हीमध्ये स्टार्ट/स्टॉप टेक्नोलॉजी देखील वापरली आहे, जे ट्रॅफिक सिग्नलवर थांबल्यावर त्याचे इंजिन आपोआप बंद करते, आणि यामुळे तुम्हाला चांगले मायलेज मिळेल.

Tata Punch
टेलिग्राम व्हॉट्सअ‍ॅपला मागे टाकणार? ओलांडला 1 अब्ज डाऊनलोडचा टप्पा

इंजिन क्षमता किती आहे?

टाटा पंच कंपनीने ही एसयूव्ही फक्त एका इंजिन पर्यायासह लॉंच केली आहे. यामध्ये कंपनीने 1.2 लिटर क्षमतेचे 3 सिलेंडरसह नॅचरली अस्पायर्ड पेट्रोल इंजिन वापरले आहे. जे 86hp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटीक गिअरबॉक्ससह येते.

मायक्रो एसयूव्हीचा आकार

एसयूव्हीच्या आकाराबद्दल सांगायचे झाल्यास, याची लांबी 3,827 मिमी, रुंदी 1,742 मिमी, उंची 1,615 मिमी आणि व्हीलबेस 2,445 मिमी आहे. या SUV मध्ये कंपनी 187mm ची ग्राउंड क्लिअरन्स देते, याशिवाय 366 लीटर क्षमतेच्या बूट स्पेसमुळे ही SUV आणखी चांगली बनते. ही SUV ALFA आर्किटेक्चर प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे आणि त्यात 90-डिग्री उघडणारे दरवाजे देखील देण्यात आले आहेत. ग्राहक 21,000 रुपये भरून ही मायक्रो एसयूव्ही बुक करू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com