
Ukraine crisis : भारतीय दूतावासाने जारी केली ॲडव्हायझरी; म्हणाले...
युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या विद्यार्थ्यांना देश सोडण्यास सांगितले आहे. भारताने रविवारी युक्रेनमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना या प्रदेशातील परिस्थितीबाबत आणखी अनिश्चितता लक्षात घेऊन तात्पुरते बाहेर जाण्यास सांगितले.
सर्व भारतीय नागरिक ज्यांचे वास्तव्य आवश्यक नाही आणि सर्व भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन तात्पुरते सोडण्याचा सल्ला देण्यात येत आहे. उपलब्ध व्यावसायिक उड्डाणे आणि चार्टर उड्डाणे सुव्यवस्थित आणि वेळेवर प्रवासासाठी वापरली जाऊ शकतात, असे ट्विट युक्रेनमधील (Ukraine) भारतीय दूतावासाने केले आहे.
विद्यार्थ्यांना चार्टर्ड फ्लाइटसाठी कॉन्ट्रॅक्टरशी सतत संपर्कात राहण्याचा सल्ला दिला जातो. तसेच दूतावासाच्या फेसबुक, वेबसाइट आणि ट्विटच्याल अद्यतनांसाठी संपर्कात रहा, असे भारतीय दूतावासाने (Embassy of India) सांगितले. विशेष म्हणजे युक्रेनमध्ये सुमारे १८,००० भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी बहुतांश विद्यार्थी तेथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेले आहेत.
यापूर्वी हेल्पलाइन क्रमांक परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी जारी केला आहे. कोणाला युक्रेनमधील (Ukraine) नातेवाइकांबद्दल काही मदत किंवा माहिती हवी असल्यास ते हेल्पलाइन क्रमांक ०११-२३०१२११३, ०११-२३०१४१०४ आणि ०११-२३०१७९०५ वर कॉल करू शकतात. याशिवाय १८००११८७९७ या टोल फ्री क्रमांकावरही कॉल करता येईल.
Web Title: Ukraine Embassy Of India Leave The Country Temporarily People Student
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..