cuet entrance exam
sakal
कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट म्हणजे ‘सीयूईटी’ ही भारतातील विविध केंद्रीय, राज्य, डीम्ड व खासगी विद्यापीठांमध्ये पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देणारी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा ‘एनटीए’द्वारे घेतली जाते. ही परीक्षा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शनाखाली घेतली जाते.
ही परीक्षा विद्यार्थ्यांना एका परीक्षेतून अनेक अभ्यासक्रम आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याची संधी देते. यापूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यापीठासाठी वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियांना सामोरे जावे लागायचे. मात्र, ‘सीयुइटी’मुळे एकाच परीक्षेच्या गुणांच्या आधारे अनेक प्रतिष्ठित विद्यापीठांचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठी खुले करून देत आहे.