
Undertaking Form: अकरावीचा ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया २६ मेपासून सुरू झाली असून, राज्यभरातील विद्यार्थी विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अनेक महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतात. त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाचे आणि आवश्यक कागदपत्र म्हणजे अंडरटेकिंग फॉर्म. परंतु, अनेकांना याचा नेमका अकरावी प्रवेशामध्ये याचा उपयोग कसा होतो, हे नीटसे माहिती नसते. चला तर मग, याबाबत सविस्तर माहिती घेऊया.