CMIE Report : भारतात बेरोजगारीचं संकट; नोव्हेंबरमध्ये दर 8.0 टक्क्यांवर पोहोचला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CMIE Report

भारतातील बेरोजगारीचा दर नोव्हेंबरमध्ये 8.0 टक्क्यांवर पोहोचला आहे.

CMIE Report : भारतात बेरोजगारीचं संकट; नोव्हेंबरमध्ये दर 8.0 टक्क्यांवर पोहोचला!

CMIE Report : नोव्हेंबरमध्ये भारतातील बेरोजगारीचा दर 8.0 टक्क्यांवर पोहोचला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (CMIE) आकडेवारीवरून हे स्पष्ट झालंय.

भारतातील बेरोजगारीचा दर नोव्हेंबरमध्ये 8.0 टक्क्यांवर पोहोचला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (Center for Monitoring India Economy CMIE) आकडेवारीवरून हे स्पष्ट झालं. नोव्हेंबर महिन्यात बेरोजगारीचा दर तीन वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. शहरांमधील बेरोजगारीचा दर मागील महिन्यात 7.21 टक्क्यांवरून नोव्हेंबरमध्ये 8.96 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याचवेळी ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर 8.04 टक्क्यांवरून 7.55 टक्क्यांवर आला आहे.

CMIE Report

CMIE Report

मुंबईस्थित CMIE च्या रोजगार डेटावर अर्थतज्ज्ञ आणि धोरणकर्ते बारकाईनं लक्ष ठेवत असतात. कारण, सरकार स्वतःची मासिक आकडेवारी जाहीर करत नाही. तर, दुसरीकडं राष्ट्रीय सांख्यिकी आयोग म्हणजेच NSO च्या आकडेवारीनुसार, शहरी भागातील 15 वर्षांवरील लोकांचा बेरोजगारीचा दर 9.8 टक्क्यांवरून 7.2 टक्क्यांवर आला आहे. हा आकडा 30 सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीचा आहे, असं पीरियडिक लेबर फोर्स सर्व्हे (Periodic Labor Force Surve) अर्थात पीएलएफएसनं सांगितलं. अहवालानुसार, हे कोरोना महामारीनंतर स्थिर आर्थिक सुधारणा दर्शवतं, ज्यामुळं कोट्यवधी लोक बेरोजगार झाले.