
Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. युनियन बँक ऑफ इंडिया (UBI) ने वेल्थ मॅनेजर पदांसाठी 250 जागांची भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट unionbankofindia.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया 8 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाली असून, 25 ऑगस्ट 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.