UPSC 2021 : दुसऱ्या प्रयत्नात दुसरा क्रमांक; अंकिता अग्रवाल शाळांसाठी करणार काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ankita agrawal

UPSC 2021 : दुसऱ्या प्रयत्नात दुसरा क्रमांक; अंकिता अग्रवाल शाळांसाठी करणार काम

मुंबई : UPSC ने सोमवारी नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला. यात कोलकात्याच्या अंकिता अग्रवालने देशातून दुसरा क्रमांक मिळवला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना तिने सांगितले की, भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी म्हणून महिला सक्षमीकरण आणि प्राथमिक आरोग्य सेवेसाठी काम करायला आवडेल.

शाळांसाठी काम करायचे आहे

अंकिताने सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. यूपीएससीमध्ये तिचा हा दुसरा प्रयत्न होता. यापूर्वी २०१८ मध्ये तिची निवड भारतीय महसूल सेवेसाठी करण्यात आली होती. अंकिता अग्रवाल सध्या हरियाणातील फरिदाबाद येथील भारतीय महसूल सेवेच्या उत्पादन शुल्क विभागात प्रोबेशनवर आहे. तिने IAS निवडले आहे आणि सेवेत रुजू झाल्यानंतर तिला महिला सक्षमीकरण, प्राथमिक आरोग्य आणि शालेय शिक्षण क्षेत्रासाठी काम करायचे आहे.

अभ्यास साहित्याचे मातृभाषेत भाषांतर

परीक्षेच्या नियोजनाबाबत सांगताना अंकिता म्हणाली की, तिने दररोज ८ ते १२ तास अभ्यास केला आणि कुटुंब, मित्र आणि त्यांच्या आरोग्यासाठीही पुरेसा वेळ दिला. अंकिता स्पष्ट करते की, तिने संगणकावर नोट्स बनवल्या कारण त्या सहज उपलब्ध होत्या. तिने अनेक स्रोतांच्या मदतीने अभ्यास केला आणि ते स्वतःच्या भाषेत अनुवादित केले जेणेकरून उजळणी करणे सोपे होईल. अंकिताने UPSC 2021 च्या परीक्षेसाठी तिचा पर्यायी विषय म्हणून राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध निवडले होते.

सर्वोच्च ३ स्थानी मुलींची बाजी

केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२१ च्या निकालात पहिल्या तीन क्रमांकांवर असलेल्या महिलांबद्दल अंकिता म्हणाली की, ही त्यांच्यासाठी आणि संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. महिलांनी पहिल्या तीन क्रमांकांवर स्थान मिळवले आहे.

Web Title: Upsc 2021 Ankita Agrawal Ranked Second In Second Attempt Willing To Work For Schools

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :UPSC Result
go to top