Multitasking Tips: IAS महिलेने सांगितले १० Apps ज्याचा तुम्हाला होईल फायदा

आयएस अधिकारी दिव्या मित्तलने UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही महत्वाच्या अॅप्सची माहिती दिली आहे.
10 Apps to help upsc aspirant for time saving
10 Apps to help upsc aspirant for time savingesakal

UPSC Aspirants दीर्घकाळाच्या मेहनतीनंतर आयएस विद्यार्थी यश मिळवत देशाच्या महत्वाच्या सेवेत रूजू होतात. दरवर्षी सगळ्यात कठीण मानली जाणारी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत पदावर रूजू होणाऱ्या अधिकाऱ्यांकडून प्रेरणा घेत लाखो लोक केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत असतात. यूपीएससी अॅस्पिरंट ते आयएस ऑफिसरचा पल्ला गाठणाऱ्या दिव्या मित्तलने विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीस फायदेशीर ठरणारे काही महत्वाचे अॅप्स सांगितले आहेत. जाणून घेऊया यूपीएससी परीक्षेसाठी महत्वाचे ठरणारे अॅप्स. (10 Apps to help upsc aspirant for time saving)

१. Dictation

तुमचे मेल, डॉक्युमेंट्स गुगल क्रोमवर इंग्रजी, मराठी, हिंदी आणि गुजराती भाषेत डिक्टेट करा. या अॅपमुळे तुमचा टायपिंगचा वेळ वाचेल. तुम्हाला फक्त या अॅपमध्ये बोलायचं आहे आणि तुम्ही बोललेलं सगळं टाईप होऊन जाणार. यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्यांचा वेळही वाचेल आणि त्यांचं दिवसाचं सगळं काम होऊन जाणार.

२. Tiny Wow

या अॅपमध्ये तुम्ही फोटोज, पीडीएफ आणि कनवर्ट फॉरमॅट्स हे सगळं शक्य आहे.

३. Canva

कॅनवा हे ग्राफिक डिझाईनसाठी वापरलं जाणारं महत्वाचं टूल आहे. यातून तुम्ही तुम्हाला हव्या असणाऱ्या टेम्पेल्ट्स सिलेक्ट करता येतात.

४. WolframAlpha

गणित विषयाच्या कुठल्याही समस्या असल्यास या अॅपमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सोल्यूशन मिळतं. तसेच केमिस्ट्री, फिजीक्स या विषयासंबंधीही माहिती तुम्हाला या अॅपवर मिळेल.

५. Hemingway

हे अॅप तुमची वाचन क्षमता वाढवण्यास मदत करते. ग्रॅमॅटिकल चूका अवॉईड करण्यास हे अॅप उत्तम आहे.

६. Simple Wikipedia

जर तुम्हाला गूगलवर वाचताना एखादी माहिती कळली नाही तर सिंपल विकीपिडीया या अॅपद्वारे तु्म्ही सोपी माहिती मिळवू शकता.

७. Project Gutenberg

हे अॅप म्हणजे जवळजवळ ६०,००० पुस्तकांचं ग्रंथालय आहे.यात जगभऱ्यातील चांगली पुस्तकं तुम्हाला फ्री वाचावयास मिळतील.

८. Diffchecker

हे अॅप तुम्हाला तुमचे सेव केलेले डॉक्युमेंट्स इमेज आहे की पीडीएफ आहे हे माहित करून देण्यास मदत करेल.

९. Craiyon

हे असं अॅप आहे ज्यातून तुम्हाला टेक्स्ट दिल्यास इमेज मिळेल.

१०. Notion

डाटा मॅनेजमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट यासाठी हे अॅप महत्वाचे ठरते. हे अॅप नोट्स काढण्यासाठी अत्यंत उपयोगी अॅप आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com