CDS Exam : सीडीएस प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) वतीने संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेसाठी (सीडीएस) ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली
upsc exam Online application process for CDS admission start
upsc exam Online application process for CDS admission startesakal

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) वतीने संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेसाठी (सीडीएस) ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून सैन्यदल, हवाईदल आणि नौदलात अधिकारी म्हणून काम करण्याची संधी तरुण-तरुणींना मिळणार आहे.

यूपीएससी मार्फत प्रत्येक वर्षी दोन वेळा सीडीएस प्रक्रिया राबवली जाते. सीडीएस प्रक्रियेतून इंडियन मिलिटरी ॲकॅडमी (आयएमए), चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (ओटीए), नेव्हल ॲकॅडमी आणि एअर फोर्स ॲकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळतो. नुकतेच यूपीएससीद्वारे २०२३ च्या वर्षातील पहिल्या सीडीएस प्रवेश प्रक्रियेबाबतच्या सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार महिला व पुरुष या दोन्ही उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

या प्रक्रिये अंतर्गत एकूण ३४१ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मान्यता प्राप्त विद्यालय किंवा संस्थेची पदवी आणि अभियांत्रिकीची पदवी असलेल्या उमेदवारांना या प्रवेश प्रक्रियेत भाग घेता येणार आहे. लेखी परीक्षा, सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखती (एसएसबी) आणि वैद्यकीय तपासणी अशा विविध टप्प्यात ही प्रक्रिया पार पडेल. तसेच या प्रक्रियेतील गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड करण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांना त्यांनी निवड केलेल्या ॲकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जाईल.

येथे करा अर्ज

इच्छुक उमेदवारांना सीडीएस प्रक्रियेशी निगडित सविस्तर माहिती तसेच ऑनलाइन अर्ज करण्यासाठी upsc.gov.in किंवा upsconline.nic.in या संकेतस्थळाचा वापर करता येईल. दरम्यान उमेदवारांना सर्वात प्रथम अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ‘वन टाइम रजिस्ट्रेशन’वर (ओटीआर) नोंदणी करणे आवश्‍यक आहे. त्यानंतर सीडीएससाठी ऑनलाइन अर्ज भरता येईल. उमेदवारांना १० जानेवारी २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ः १० जानेवारी २०२३

अर्ज माघार घेण्याची मुदत ः १८ ते २४ जानेवारी २०२३

सीडीएसची लेखी परीक्षा ः १६ एप्रिल २०२३

अशी असेल राखीव जागा आणि वयोमर्यादा

प्रशिक्षण संस्था ः राखीव जागा ः वयोमर्यादा

आयएमए ः १०० ः १९ ते २४ वर्षे

नेव्हल ॲकॅडमी ः २२ ः १९ ते २४ वर्षे

एअर फोर्स ॲकॅडमी ः ३२ ः २० ते २४ वर्षे

ओटीए (चेन्नई) ः १८७ ः १९ ते २५ वर्षे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com