UPSC Mains Exam Result 2025 Declear: संघ लोक सेवा अयोग (UPSC) ने सिव्हिल सेवा मुख्य परीक्षा २०२५ चा नुकताच निकाल जाहीर केला आहे. यामध्ये एकूण २७३६ उमेदवार पुढील टप्प्यातील इंटरव्ह्यूसाठी निवडले गेले आहेत..पास झालेले उमेदवार UPSC अधिकृत वेबसाइट upsc.gov.in किंवा upsconline.nic.in यावर जाऊन आपला निकाल पाहून सहज डाउनलोड करू शकतात..Maharashtra CET Exam 2026: राज्यात आता वर्षातून दोन सीईटी परीक्षा; विद्यार्थांना मिळणार दुहेरी संधी! .यूपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल कसा पाहावा?UPSC अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.होमपेजवर 'Final Result' सेक्शन निवडा.'Civil Services (Main) Examination 2025' समोरील PDF लिंकवर क्लिक करा.PDF मध्ये आपले नाव आणि रोल नंबर शोधा.भविष्यासाठी PDF डाउनलोड किंवा प्रिंट करा..इंटरव्ह्यूसाठी तयारीमुख्य परीक्षा २२ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट पर्यंत घेण्यात आली होती. पीडीएफमध्ये दिलेल्या रोल नंबरसह पात्र ठरलेल्या उमेदवारांना व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखत) मध्ये सहभागी व्हावे लागेल. यूपीएससी मुलाखतीची तारीख आणि वेळापत्रक अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाईल. उमेदवारांनी त्यांचे वेळापत्रक लक्षात घेऊन तयारी करणे आवश्यक आहे..World Pneumonia Day: हवामान बदलले की वाढतोय न्यूमोनियाचा धोका; तज्ञांकडून प्रभावी आरोग्यदायी उपाय जाणून घ्या.फायनल निकालमुलाखतीनंतर, यूपीएससी २०२५ मध्ये अंतिम निकाल जाहीर करेल. त्यात प्रिलिम्स, मेन्स आणि फायनल कटऑफची माहिती आहे. उमेदवार त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकतात..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.