esakal | UPSC Prelims 2021: अभ्यासाचे योग्य नियोजन करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

बोलून बातमी शोधा

upsc preperation

UPSC Prelims 2021: अभ्यासाचे योग्य नियोजन करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: UPSC 2021 Prelims: यूनियन पब्लिक सर्विस कमीशनची (UPSC) यावर्षीची परीक्षा २७ जूनला होणार आहे. या परीक्षेला देशातील सर्वात अवघड परीक्षा मानली जाते. जे उमेदवार ही परीक्षा देणार आहेत त्यांनी परीक्षेच्या नोट्स कशा काढाव्यात आणि तयारी कशी करावी याबद्दल जाणून घेऊया.

परीक्षार्थींना पेपरची तयारी करण्यासाठी अजून दोन महिने वेळ आहे. त्यामूळे उमेदवारांनी वेळेची योग्य नियोजन केले पाहिजे. तसेच राहिलेला सर्व वेळ अभ्यासासाठी कसा वापरला जाईल यावर लक्ष दिले पाहिजे. परीक्षा जवळ आल्यानंतर योग्य रिवजनची गरज असते त्यासाठी तुम्ही नोट्स काढलेल्या असाव्यात कारण शेवटी तुमच्याकडे सगळी पुस्तके वाचण्यास वेळ नसणार आहे.

हेही वाचा: औरंगाबादमध्ये एका दिवसाच्या चिमुकल्यावर हृदयरोगाची यशस्वी शस्त्रक्रिया

UPSC 2021 Prelims परीक्षेची तयारी करताना कसा अभ्यास केला पाहिजे?

- एका वहीमध्ये सर्व चॅप्टर टॉपिक वाइज लिहून काढा.

- प्रत्येक महिन्याच्या करंट अफेयर्ससाठी एक वही किंवा कॉपी तयार करा.

- तसेच बजेट आणि इकॉनॉमिक सर्वेंसाठी एक कॉपी तयार केली पाहिजे.

- एक असं शेड्यूल तयार करा ज्यामध्ये महत्त्वाच्या विषयांवर जास्त फोकस करा.

- यापुर्वीचे ५ वर्षांचे पेपर सोडवून त्यांची प्रॅक्टीस करा.

- कोणत्या भागावर किती आणि कसे प्रश्न विचारले जातात याचे अॅनेलिसिस करा.

- पुर्वी झालेल्या चूका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्या.

यूपीएससीची परीक्षा ही देशातील कठीण परीक्षांपैकी एक परीक्षा आहे. यासाठी तीन स्तरांतून उमेदवारांना जावं लागतं. पहिल्यांदा प्रीलिम्स, त्यानंतर मेन्स परीक्षा आणि शेवटी मुलाखत.