esakal | औरंगाबादमध्ये एका दिवसाच्या चिमुकल्यावर हृदयरोगाची यशस्वी शस्त्रक्रिया

बोलून बातमी शोधा

baby
औरंगाबादमध्ये एका दिवसाच्या चिमुकल्यावर हृदयरोगाची यशस्वी शस्त्रक्रिया
sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद: बाळ जन्मले, पण श्‍वसनाचा त्रास होत असल्याने कृत्रिम श्‍वासही दिला; त्यानंतरही नैसर्गिकपणे त्याला श्‍वास घेता येत नव्हता. टुडी इको ही हृदयाची तपासणी केली तेव्हा बाळाला जन्मजात हृदयरोग असल्याचे निदान झाले. एमजीएमच्या डॉक्टरांनी तात्काळ प्रयत्न सुरु केले व जोखीमपणे ही शस्त्रक्रिया सुखरुप पार पाडली तेव्हा बाळाचा श्‍वास मोकळा झाला व ते मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले.

एका दिवसाच्या तान्हुले बाळाला श्वसनाच्या त्रासामुळे एमजीएम रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात भरती केले. या बाळाला तज्ञ डॉक्टर सुनील गव्हाणे व त्यांची पथकाने उपचार सुरू केले. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यास कृत्रिम श्वास मशीनद्वारे देण्याचा निर्णय वेळीच घेण्यात आला. इतर तपासण्यांच्या रिपोर्ट प्रमाणे योग्य औषध उपचारही लगेचच सुरू करण्यात आले, त्याचाच परिणाम बाळाला कृत्रिम श्वास मशीनबाहेर घेण्यात आले.

हेही वाचा: Corona Updates: दिलासादायक! बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले

मात्र परत बाळाला श्वसनाचा त्रास होऊ लागला व मशिनचा सपोर्ट देण्यात आला. टुडी इको करण्यात आला. त्यात बाळाला जन्मजात हृदयरोग असल्याचे निदान झाले. औषधांचा विशेष प्रतिसाद न आल्याने या बाळावर जोखमीची हृदय शस्त्रक्रिया बाल हृदय शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. सुहद अन्नछत्रे व त्यांच्या पथकाने केली. त्यानंतर पंधरा दिवस हे बाळ नवजात शिशू अतिदक्षता विभागात औषध उपचार घेत होते. डॉ. सुनील गव्हाणे व त्यांच्या पथकाने या बाळाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. संस्थेचे विश्वस्त अंकुशराव कदम, डॉ. पी. एम. जाधव, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा, उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी सर्व डॉक्टरांचे अभिनंदन केले.