

upsc exam
esakal
नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सर्व परीक्षांमध्ये ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांग (पीडब्ल्यूबीडी) उमेदवारांना हवे ते सोयीनुसार ‘परीक्षा केंद्र’ अनिवार्यपणे देण्यात येणार आहे. दिव्यांग उमेदवारांना परीक्षेची सुविधा अन् सोयी वाढवण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे ‘यूपीएससी’च्या अधिकृत निवेदनात नमूद करण्यात आले.