esakal | फक्त मुलाखत द्या अन् सरकारी नोकरी मिळवा; UPSCमध्ये २९६ पदांची भरती​
sakal

बोलून बातमी शोधा

UPSC

यूपीएससीने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, ११ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज करावेत.

फक्त मुलाखत द्या अन् सरकारी नोकरी मिळवा; UPSCमध्ये २९६ पदांची भरती​

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

UPSC Recruitment 2021: नवी दिल्ली / पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) विविध पदांवर भरतीसाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

विशेष म्हणजे यासाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. अधिक माहितासाठी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्याचा सल्ला देण्यात येत आहे. यूपीएससीमध्ये एकूण २९६ पदे रिक्त आहेत. 

महामेट्रोमध्ये १३९ पदांची भरती; अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ!​

पदांचा तपशील -
- डेटा प्रोसेसिंग असिस्टंट - ११६
असिस्टंट पब्लिक प्रॉसेक्यूटर - ८०
ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर - ६
स्पेशालिस्ट ग्रेड ३ असिस्टंट प्रोफेसर - ४५
लेक्चरर - १
असिस्टंट डायरेक्टर - १

या पदांसाठी अर्ज करण्यासाठीची शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कॉम्प्युटर सायन्स, कॉम्युटर अॅप्लिकेशन, आयटीमध्ये पदवी, तसेच बीई, बीटेक, एमबीबीएस, एलएलबी, एलएलएम या विषयातील पदवी असणे आवश्यक आहे. 

SSC Recruitment : १०वी, १२वी पास उमेदवारांनो, सरकारी नोकरी पाहतेय तुमची वाट!​

वयोमर्यादा -
वरील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३० ते ४०च्या दरम्यान असणे अनिवार्य आहे. 

अर्ज करण्यासाठी आवश्यक
यूपीएससीने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, ११ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज करावेत, त्यानंतर उमेदवारांना अर्ज करता येणार नाहीत. अर्जासाठी २५ रुपये शुल्क आकारण्यात येईल. 

इंडियन ऑइलमध्ये इंजिनिअर पदासाठी भरती; पगार १.०५ लाख रुपये!​ 

निवड कशी होणार?
वर नमूद केलेल्या पदांसाठी मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. अर्जदारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. अर्जदारांची संख्या जास्त झाल्यास लेखी परीक्षेचाही पर्याय आयोगानं राखून ठेवला आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांची माहिती द्यावी लागणार आहे.

UPSCच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा

अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top