UPSC Result : कापड दुकानदाराच्या पोरानं करुन दाखवलं! यूपीएससीत ओंकार गुंडगे देशात 380 वा

ओंकार गुंडगे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (Central Public Service Commission Exam) देशात ३८० वा क्रमांक मिळवून यशाला गवसणी घातली.
UPSC Result 2023 Omkar Gundge 380th Rank
UPSC Result 2023 Omkar Gundge 380th Rankesakal
Summary

ओंकारचे माध्यमिक शिक्षण मेरीमाता इंग्लिश स्कूल मीडियम म्हसवड येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण रुईया कॉलेज मुंबई येथे झाले.

दहिवडी : माणची माती बौद्धिक क्षेत्रात कसदार असल्याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली. दहिवडीचा (Dahiwadi) सुपुत्र ओंकार गुंडगे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (Central Public Service Commission Exam) देशात ३८० वा क्रमांक मिळवून यशाला गवसणी घातली.

ओंकारचे (Omkar Gundage) हे यश कुटुंबीयांसह मित्रपरिवाराने फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत साजरे केले. ओंकार हा सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती अॅड. भास्करराव गुंडगे यांचा पुतण्या व येथील प्रथितयश कापड दुकानदार राजेंद्र गुंडगे यांचा सुपुत्र आहे.

ओंकारचे माध्यमिक शिक्षण मेरीमाता इंग्लिश स्कूल मीडियम म्हसवड येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण रुईया कॉलेज मुंबई येथे झाले. तर, आयएलएस लॉ कॉलेज पुणे येथून त्याने बीएसएलएलएलबी ही पदवी २०१७ साली मिळवली. या पदवीच्या तिसऱ्या वर्षी तो विद्यापीठात प्रथम आला होता.

UPSC Result 2023 Omkar Gundge 380th Rank
Jalna : दोन वर्षांत रोखले तब्बल 'इतके' बालविवाह; पाच महिन्यात 18 अल्पवयीन मुलींना दिलासा

त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या (UPSC Civil Services Exam Result 2022) अभ्यासासाठी तो दिल्ली येथे गेला. चार प्रयत्नात पूर्व परीक्षा पास होऊनही मुख्य परीक्षेत त्याला अपयशाला सामोरे जावे लागले. मात्र, पाचव्या प्रयत्नात मुलाखतीसाठी पात्र होऊन देशात ३८० वा आला. या यशानंतर ओंकार वर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, अनेक मान्यवरांनी भेट घेऊन त्याला व कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या.

UPSC Result 2023 Omkar Gundge 380th Rank
Teacher Recruitment : ..अखेर शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा; बेरोजगार उमेदवारांना शिक्षक होण्याची संधी!

सोशल मीडियावरील गोष्टींवर विश्‍वास न ठेवता शिस्तबद्धपणे आठ ते दहा तास अभ्यास केला तरी यश मिळवता येते. व्यायाम हा अतिशय महत्त्वाचा असून, त्यामुळे आपल्याला अभ्यासासाठी ऊर्जा प्राप्त होते.

-ओंकार गुंडगे

इट वॉज माय प्रिसिअस ड्रीम. मला स्वतःला कलेक्टर व्हायचं होतं. आज माझं स्वप्न माझ्या मुलाने पूर्ण केल्याने मला खूप आनंद झाला आहे.

-सुवर्णा गुंडगे, ओंकारची आई.

या यशाने ओंकारने आमच्या कुटुंबाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रामाणिकपणे देशसेवा करून तो आमची मान उंचावेल.

-अॅड. भास्करराव गुंडगे.

ओंकार हा पुणे विद्यापीठाच्या व्हॉलिबॉल संघाचा कर्णधार होता. आताही त्याने खेळाचा व व्यायामाचा आनंद घेत हे उत्तुंग यश मिळवून एक खेळाडूसुद्धा मोठा अधिकारी होऊ शकतो, हे दाखवून दिले.

-विठ्ठल चौगुले, प्रसिद्ध व्हॉलिबॉलपटू.

UPSC Result 2023 Omkar Gundge 380th Rank
Congress MLA : काँग्रेस आमदाराचा नादच खुळा! चक्क बैलगाडीवर स्वार होत गाठलं विधानसौध

महाराष्ट्रातील उत्तीर्ण उमेदवार

  • कश्मिरा किशोर सांखे - (ठाणे)- २५

  • जान्हवी मनीष साठे- (ठाणे)- १२७

  • ऋषीकेश हनुमंत शिंदे- (सांगली)- १८३

  • हर्ष मंडलिक- (मुंबई)- ३१०

  • अनिकेत ज्ञानेश्वर हिरडे - (ठाणे)- ३४९

  • अनिकेत विजयसिंग पाटील- (जळगाव)- ४६२

  • आशीष अशोक पाटील- (कोल्हापूर)- ४६३

  • स्वप्नील बागल- (हिंगोली)- ५०४

  • सय्यद मोहम्मद उस्मान (मुंबई)- ५७०

  • रोशन केवलसिंग कछवा- (जळगाव)- ६२०

  • करण नरेंद्र मोरे- (सातारा)- ६४८

  • राहुल रमेश अत्राम- (नागपूर)- ६६३

  • सुमेध मिलिंद जाधव- (यवतमाळ)- ६८७

  • अतुल निवृत्तीराव ढाकणे - (बीड)- ७३७

  • निखिल अनंत कांबळे- (पुणे)- ८१६

  • निहाल प्रमोद कोरे- (सांगली)- ९२२

  • ओंकार गुंडगे, राजश्री देशमुख, प्रतीक कोरडे व पूजा खेडकर यांच्या नावांचा गुणवत्ता यादीत प्रोव्हिजनल म्हणून उल्लेख आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com