UPSC करणार सहाय्यक व सहयोगी प्राध्यापकांची भरती! जाणून घ्या सविस्तर

UPSC करणार सहाय्यक आणि सहयोगी प्राध्यापकांची भरती! जाणून घ्या सविस्तर
UPSC
UPSCsakal
Summary

निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उमेदवारांनी नोंद घ्यावी, की उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग त्यांनी अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे केली जाईल.

सोलापूर : युनियन लोकसेवा आयोग (Union Public Service Commission - UPSC) ने सहाय्यक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या नियुक्‍त्या प्राध्यापक, नियंत्रण प्रणाली, सहयोगी प्राध्यापक, कॉम्प्युटर सायन्स, सहयोगी प्राध्यापक, इलेक्‍ट्रिकल इंजिनिअर, सहयोगी प्राध्यापक, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि कम्युनिकेशन इंजिनिअर, यांत्रिक अभियांत्रिकी, सहयोगी प्राध्यापक / मेटलर्जी प्रॉडक्‍ट इंजिनिअर या पदांसाठी (Jobs) केल्या जातील. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 21 पदांची भरती केली जाणार आहे. अशा परिस्थितीत ज्या उमेदवाराला या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल, ते upsc.gov.in वर अर्ज करू शकतात.

UPSC
हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स लिमिटेडमध्ये स्टाफ नर्स पदांची भरती!

या तारखा लक्षात ठेवा

  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 16 डिसेंबर 2021

  • ऑनलाइन अर्ज प्रिंट करण्याची शेवटची तारीख : 17 डिसेंबर 2021

असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी असा करा ऑनलाइन अर्ज

असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट देणे आवश्‍यक आहे. त्यानंतर आता Apply online या पर्यायावर क्‍लिक करा. आता एक नवीन विंडो उघडेल. त्यानंतर उमेदवारांनी आता 'विविध पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन भरती अर्ज (ORA)' अधिसूचनेवर क्‍लिक करावे. उमेदवारांना नवीन वेबसाइटवर निर्देशित केले जाईल. आता ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्या पदावर क्‍लिक करून अर्ज सादर करावा. उमेदवारांनी नोंद घ्यावी, की त्यांना त्यांचे नाव, अर्ज क्रमांक, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आणि इतर तपशिलांसह नोंदणी करावी लागेल. त्यानंतर उमेदवारांनी अर्ज भरावा. उमेदवारांनी भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रत सोबत ठेवावी.

UPSC
वडिलांच्या राज्यमंत्रिपदाचा डामडौल न करता निर्माण केली स्वत:ची ओळख!

उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे, की त्यांनी शेवटच्या तारखेपूर्वी या पदांसाठी अर्ज भरावा, कारण शेवटच्या क्षणी अर्ज केल्याने अर्जदारांना काही वेळा अडचणी येऊ शकतात. तसेच, उमेदवारांनी भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रत सोबत ठेवावी. अर्ज भरल्यानंतर, निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उमेदवारांनी नोंद घ्यावी, की उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग त्यांनी अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे केली जाईल. उमेदवारांनी हेही नोंद घ्यावी की त्यांना मुलाखतीच्या वेळी आवश्‍यक कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे सादर करावी लागतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com