UPTET 2021 Exam : पेपरफुटीनंतर परीक्षेची नवीन तारीख जाहीर

काही जिल्ह्यांतील परीक्षा केंद्र बदलण्याची तयारी सुरू आहे
TET exam
TET examTET exam

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश मूलभूत शिक्षण विभाग २३ जानेवारी २०२२ रोजी (New exam date announced) शिक्षक पात्रता परीक्षा (UP TET) आयोजित (Notification issued) करणार आहे. नोव्हेंबरमध्ये रद्द झालेल्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्याने सर्व अटकळांवर पूर्णविराम लागला आहे. २८ नोव्हेंबरला होणारी UPTET परीक्षा पेपरफुटीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. एका महिन्यात परीक्षा घेण्याचे सरकारने सांगितले होते. प्राथमिक स्तराची परीक्षा पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी १० ते १२.३० या वेळेत तर उच्च प्राथमिक स्तराची परीक्षा दुसऱ्या शिफ्टमध्ये दुपारी २.३० ते ५ या वेळेत घेतली जाणार आहे.

टीईटी प्राथमिक स्तराच्या परीक्षेसाठी १३.५२ लाख उमेदवारांनी आणि टीईटी (UPTET 2021) उच्च प्राथमिक स्तराच्या परीक्षेसाठी ८.९३ लाख उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या परीक्षेसाठी प्रवेशपत्रे पुन्हा जारी केली जातील. उमेदवारांना नवीन प्रवेशपत्र डाउनलोड करावे लागेल. त्यांना जुन्या परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.

TET exam
क्षणाची हौस बेतली जीवावर; २१ वर्षीय तरुणीचा तडफडून मृत्यू

एवढेच नाही तर काही जिल्ह्यांतील परीक्षा केंद्र बदलण्याची तयारी सुरू आहे. उमेदवार १२ जानेवारी २०२१ पासून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार उत्तर प्रदेश टीईटी २०२१ परीक्षेचा निकाल २५ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर केला (Notification issued) जाईल.

परीक्षेसंबंधात महत्त्वाच्या तारखा

  • प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख - १२ जानेवारी २०२२

  • परीक्षेची तारीख - २३ जानेवारी २०२२

  • अंतरिम उत्तर कुंजी जारी करणे - २७ जानेवारी २०२२

  • आक्षेप नोंदवण्याची शेवटची तारीख - १ फेब्रुवारी २०२२

  • अंतिम उत्तर कुंजी प्रकाशन तारीख - २३ फेब्रुवारी २०२२

  • निकाल प्रकाशन तारीख - २५ फेब्रुवारी २०२२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com