Jobs : रेल भूमी विकास प्राधिकरणमध्ये सरकारी नोकऱ्या! 23 डिसेंबरपर्यंत करा अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल भूमी विकास प्राधिकरण
रेल भूमी विकास प्राधिकरणमध्ये सरकारी नोकऱ्या! 23 डिसेंबरपर्यंत करा अर्ज

रेल भूमी विकास प्राधिकरणमध्ये सरकारी नोकऱ्या! असा करा अर्ज

सोलापूर : रेल्वे मंत्रालयाच्या (Ministry of Railways) अंतर्गत सरकारी नोकरीची (Government Jobs) संधी आहे. रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत भारत सरकारच्या वैधानिक प्राधिकरण असलेल्या रेल भूमी विकास प्राधिकरण (Railway Land Development Authority : RLDA) ने देशभरातील विविध प्रकल्पांमध्ये सहाय्यक प्रकल्प अभियंता पदांच्या भरतीसाठी (Recruitment) जाहिरात जारी केली आहे. प्राधिकरणाने जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार (क्रमांक RLDA/ CONTRACT/ 2021/ 02) एकूण 45 पदांची भरती करायची आहे, जी कंत्राटी पद्धतीची असतील. कराराची मुदत तीन वर्षे निश्‍चित करण्यात आली आहे. मात्र, या काळात उमेदवारांच्या क्षमतेचा दरवर्षी आढावा घेतला जाईल. कालावधी संपल्यानंतर करार आणखी काही वर्षांनी वाढविला जाऊ शकतो, जो केवळ प्रकल्पाच्या कालावधीसाठी असेल.

असा करा अर्ज

इच्छुक उमेदवार RLDA च्या अधिकृत वेबसाइट rlda.indianrailways.gov.in वर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन फॉर्मद्वारे अर्ज करू शकतील. उमेदवारांना भरतीची जाहिरात डाउनलोड करावी लागेल. अर्जाचा नमुना जाहिरातीतच दिला आहे. हा फॉर्म पूर्णपणे भरून आणि जारी केलेल्या ई-मेल आयडी psecontract@gmail.com वर विविध प्रमाणपत्रांची स्कॅन केलेली प्रत, ई-मेल आयडी संलग्न करा. RLDA ने अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 23 डिसेंबर 2021 निश्‍चित केली आहे. RLDA द्वारे इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या पात्रता

RLDA सहाय्यक प्रकल्प अभियंता भरती 2021 च्या जाहिरातीनुसार, केवळ तेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत, ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून किमान 60 टक्के गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पूर्णवेळ BE किंवा B.Tech पदवी उत्तीर्ण केली आहे. तसेच, उमेदवारांकडे वैध GATE स्कोअर असणे आवश्‍यक आहे. याशिवाय, उमेदवारांचे वय 23 डिसेंबर 2021 रोजी 21 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे.