Jobs : NITI आयोगामध्ये विविध पदांची भरती! 30 नोव्हेंबरपर्यंत करा ऑनलाइन अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NITI आयोगामध्ये विविध पदांची भरती! 30 नोव्हेंबरपर्यंत करा ऑनलाइन अर्ज
NITI आयोगामध्ये विविध पदांची भरती! 30 नोव्हेंबरपर्यंत करा ऑनलाइन अर्ज

NITI आयोगामध्ये विविध पदांची भरती! 30 नोव्हेंबरपर्यंत करा ऑनलाइन अर्ज

सोलापूर : जर तुम्हाला नीती आयोगामध्ये (NITI Aayog) काम करण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. NITI Aayog ने तरुण व्यावसायिक, वरिष्ठ सल्लागार, सार्वजनिक धोरण विशेषज्ञ ग्रेड 2, सार्वजनिक धोरण विश्‍लेषक ग्रेड 1, सार्वजनिक धोरण विश्‍लेषक ग्रेड 1 (कायदा), सल्लागार ग्रेड 1 (कृषी आणि ऊर्जा) च्या 24 पदांच्या भरतीसाठी (Recruitment) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आयोगाकडून या सर्व पदांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे. NITI आयोगाने जारी केलेल्या पदांनुसार व वेगवेगळ्या भरती जाहिरातींनुसार सर्व पदांसाठी कराराचा कालावधी दोन वर्षांचा असेल.

हेही वाचा: ST संपामुळे PhDच्या मुलाखती लांबणीवर! 'या' तारखेपासून मौखिक परीक्षा

असा करा अर्ज

इच्छुक उमेदवार NITI आयोग भरतीसाठी अधिकृत वेबसाइट niti.gov.in वर दिलेल्या ऑनलाइन फॉर्मद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे आणि उमेदवार 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत त्यांचे अर्ज ऑनलाइन सबमिट करू शकतील. अर्ज प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल आणि नंतर त्यांच्या तपशिलांसह लॉग इन करून, उमेदवार त्यांचा अर्ज सबमिट करू शकतील. अर्ज केल्यानंतर उमेदवारांनी अर्जाची सॉफ्ट कॉपी जतन करून ठेवावी.

हेही वाचा: तुम्हाला OK या शब्दाचा अर्थ किंवा फुलफॉर्म माहिती आहे का?

पोस्टनिहाय रिक्त पदांची संख्या आणि वेतन

  • यंग प्रोफेशनल : 17 पदे, 60 हजार रुपये दरमहा पगार

  • वरिष्ठ सल्लागार (कायदा) : 1 पद, दरमहा 2.65 ते 2.30 लाख रुपये पगार

  • सार्वजनिक धोरण विशेषज्ञ ग्रेड 2 : 1 पोस्ट, रु. 1.45 लाख ते 2.65 लाख प्रति महिना पगार

  • सार्वजनिक धोरण विशेषज्ञ ग्रेड 1 (कायदा) : 1 पद, 80 हजार ते 1.45 लाख प्रति महिना पगार

  • सार्वजनिक धोरण विशेषज्ञ ग्रेड 1 : 2 पदे, 80 हजार ते 1.45 लाख रुपये प्रति महिना पगार

  • सल्लागार ग्रेड 1 : 1 पद, 80 हजार ते 1.45 लाख रुपये प्रति महिना पगार

  • सल्लागार ग्रेड 1 (कृषी) : 1 पद, 80 हजार ते 1.45 लाख रुपये प्रति महिना पगार

loading image
go to top