Video : तुम्हाला OK या शब्दाचा अर्थ किंवा फुलफॉर्म माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुम्हाला OK या शब्दाचा अर्थ किंवा फुलफॉर्म माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर
Video : तुम्हाला OK या शब्दाचा अर्थ किंवा फुलफॉर्म माहिती आहे का?

तुम्हाला OK या शब्दाचा अर्थ किंवा फुलफॉर्म माहिती आहे का?

रोपळे बुद्रूक (सोलापूर) : आपली मातृभाषा (Mother Tongue) किंवा बोलीभाषा कोणतीही असली, तरी ती भाषा (Language) बोलताना OK हा इंग्रजी शब्द हमखास वापरला जातो. यात अनेकांना तर ओके म्हणण्याची जणू सवयच लागलेली असते. परंतु, कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का की, OK या शब्दाचा अर्थ किंवा फूलफॉर्म काय आहे? तर रोपळे (ता. पंढरपूर) येथील झाडाखालच्या शाळेत पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या OK Boy ची भेट झाल्यावर OK चा अर्थ शोधण्याची जिज्ञासा निर्माण झाली.

OK चा अर्थ शोधण्याची जिज्ञासा, झाडाखालच्या शाळेत शिकतोय OK Boy!

OK हा इंग्रजी शब्द प्रत्येकाच्या बोलण्यात कितीतरी वेळा येत असतो. तेव्हा याचा अंदाजही येत नाही, की आपण किती वेळा OK उच्चारतो. बालदिनाच्या निमित्ताने अरुण माळी या शिक्षकाने मोफत सुरू केलेल्या झाडाखालच्या शाळेत काही मुलांशी संवाद साधला, तेव्हा पहिलीच्या वर्गात शिकणारा सोहम महादेव लोखंडे (वय 7) हा चिमुुकला त्याच्या प्रत्येक वाक्‍यात OK हा इंग्रजी शब्द उच्चारत होता. OK म्हणजे सांगितलेले काम करतो, असा त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास होता. याबाबत सोहमने ओके म्हणायला मला शाळेत सरांनी शिकवल्याचे सांगितले. सोहमची आई अश्विनी व वडील महादेव हे शेती करतात. घरातले सर्वजण त्याला चिकू म्हणतात. चिकूच्या OK उच्चारण्याच्या लकबीमुळे तो आज Ok Boy ठरला आहे.

हेही वाचा: माजी आमदारांमध्ये 'यांना' मिळतेय सर्वाधिक पेन्शन! कोण आहेत टॉपवर?

असा झाला 'ओके' म्हणण्याला प्रारंभ

अकलूज येथील बहुभाषेचे अभ्यासक प्रा. डॉ. अरविंद कुंभार यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी OK शब्द वापरण्याचा प्रयोग सर्वांत पहिल्यांदा 1839 मध्ये करण्यात आला असल्याचे सांगितले. या शब्दाचा फुलफॉर्म त्यांनी 'oll korrect' असा असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी oll korrect शिवाय OK चा फुलफॉर्म Objection killed, Old Kinderhook, ग्रीक शब्द Olla kalla म्हणजे all good, O Kendall & Sons जे त्यांच्या प्रॉडक्‍ट्‌सवर Initials 'OK' लिहितात. तर 'Ober Kommando' या एका जर्मन General यामध्ये documents साइन करण्यासाठी OK लिहिण्याची पद्धत रूढ असल्याचे सांगितले.

हेही वाचा: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनाची पूर्तता नाहीच!

इंग्लिश भाषातज्ज्ञ एलन वॉकर रिड यांच्या मते, ओके शब्दाचा सर्वप्रथम वापर 1839 साली करण्यात आला होता. याचा मूळ स्रोत जर्मन भाषेतील असून फुलफॉर्म oll korrect असा आहे. म्हणजेच याचा अर्थ सर्व काही ठीक आहे, असा होतो. OK म्हणजे अलीकडच्या काळात बरोबर किंवा काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने ओके म्हणण्याची लोकांना सवय झाली आहे.

- डॉ . अरविंद कुंभार, बहुभाषेचे अभ्यासक, अकलूज

loading image
go to top