‘एमबीए’तील करिअरसंधी

कोणत्याही आस्थापनेमध्ये व्यवस्थापन करणे हे सर्वांत महत्त्वाचे काम असते.
Opportunity in MBA
Opportunity in MBASakal

- प्रा. विजय नवले, करिअरतज्ज्ञ

कोणत्याही आस्थापनेमध्ये व्यवस्थापन करणे हे सर्वांत महत्त्वाचे काम असते. तुलनेने कमी वयाच्या युवा पिढीने नेतृत्व केले, तर त्यांच्या तल्लख बुद्धिमत्तेचा, जोरदार कर्तृत्वाचा वापर संस्था, आस्थापना यांना होऊ शकतो. म्हणून पदवीधरांना मॅनेजमेंटचे शिक्षण देऊन कमी वयात या क्षेत्रात आणण्यासाठी असे अभ्यासक्रम विकसित केले जातात. त्यापैकी सर्वांत उत्तम कोर्स आहे, ‘एम.बी.ए.’ (मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन). त्यातून व्यवस्थापक घडवले जातात. व्यवस्थापन शास्त्रातील ही पदव्युत्तर पदवी आहे.

पात्रता

कोणत्याही पदवीनंतर म्हणजेच बी.ए., बी.कॉम, बी.एस्सी., बी.ई., बी.बी.ए., बी.सी.ए. किंवा अन्य कोणत्याही पदवीनंतर ‘एम.बी.ए.’ करता येते. पदवी परीक्षेत कमीत कमी ५० टक्के (४५% मागासवर्गीयांसाठी) गुण अपेक्षित आहेत. महाराष्ट्राच्या ‘एमबीए सीईटी’ परीक्षेतून पात्र ठरणे महत्त्वाचे असते.

प्रवेश परीक्षा

‘कॅट’, ‘मॅट’, ‘स्नॅप’, ‘आत्मा’, ‘एक्सएटी’ या राष्ट्रीय स्तरावरच्या प्रवेश परीक्षा आहेत. ‘जी-मॅट’ ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा आहे. प्रवेश परीक्षेमध्ये बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांची लेखी परीक्षा, ग्रुप डिस्कशन, पर्सनल इंटरव्ह्यू असे टप्पे असतात.

स्पेशलायझेशन्स

व्यवस्थापन शास्त्रात मार्केटिंग, एच.आर. (ह्यूमन रिसोर्स), फायनान्स, इंटरनॅशनल बिझनेस, ऑपरेशन रीसर्च, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आंत्रेप्रेन्युअरशिप, डेटा ॲनालिटिक्स आदी स्पेशलायजेशन्स उपलब्ध असतात.

कालावधी आणि स्वरूप

‘एमबीए’ कोर्स २ वर्षांचा आहे. थिअरी लेक्चर्स सोबतच प्रॅक्टिकल्स च्या असाइन्मेंट्स द्वारे व्यवस्थापनाचे धडे या विद्यार्थ्यांना शिकविले जातात. पहिल्या वर्षात सर्व विषय अभ्यासावे लागतात. फायनान्स, एच आर, मार्केटिंग, कम्युनिकेशन स्किल्स, बिझनेस मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, बिझनेस लॉ आदी विषय शिकविले जातात. विद्यार्थ्यांना शास्त्रोक्त पद्धतीने ग्रुमिंग केले जाते.

प्रत्यक्ष जनसंपर्क, संवाद कौशल्ये, टीम वर्क, निर्णय प्रक्रिया अशा अनेक गोष्टी शिकविल्या जातात. प्रेझेंटेशन्स, ग्रुप टास्क, इंडस्ट्री कनेक्ट यांचा परिचय करून दिला जातो. इंटर्नशिप आणि लाइव्ह प्रोजेक्ट्समुळे विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट कल्चर, कार्यपद्धती यांचे ओरिएन्टेशन मिळते. प्रत्यक्ष कामाचा आणि जबाबदारीचा अनुभव मिळतो. या सर्व प्रक्रियेत व्यक्ती घडला जातो नवीन आव्हाने पेलण्यासाठी. अत्यंत व्यग्र असलेल्या दिनक्रमामुळे विद्यार्थी सॉफ्ट स्किल्स, स्ट्रेस मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, एटिकेट्स, मॅनर्स या गोष्टी शिकतात.

नोकरीची संधी

उत्तम पगाराची नोकरी, कॉर्पोरेट क्षेत्रात वरिष्ठ पातळीवरची जबाबदारी, व्यवसाय, उद्योजकता, कन्सल्टन्ट आदी पदांवर करिअरच्या संधी उपलब्ध असतात. कंपनीच्या सर्वोच्च स्थानी पोहचण्याची क्षमता ‘एमबीए’ पदवीधराकडे असते. अर्थात त्यानंतरचा प्रवास संबंधित व्यक्तीच्या गुणवत्तेवर आणि कार्यक्षमतेवर अवलंबून असतो.

‘एम.बी.ए.’ फायनान्सनंतर चीफ फायनान्शियल ऑफिसर, ॲसेट मॅनेजर, फायनान्शियल ॲनालिस्ट तर मार्केटिंगनंतर बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, ब्रँड मॅनेजर, सेल्स मॅनेजर, मार्केटिंग मॅनेजर अशा पदांवर काम करता येते. एच.आर. मॅनेजमेंटनंतर स्टाफिंग डायरेक्टर, रिक्रूटर, ट्रेनिंग हेड, एम्प्लॉयमेंट मॅनेजर अशी पदे मिळू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com