अमेरिकेत शिकायला घाबरू नका, या आहेत ईझी स्टेप्स

विलास सावरगावकर
Thursday, 2 January 2020

अमेरिकेत महाविद्यालयात पदवी मिळवण्यासाठी बारावीनंतर एसएटी परीक्षा पूर्ण कराव्या लागतात. येथे पदवीसाठी पहिल्या वर्षी तुम्ही अभियांत्रिकी, वैद्यकीय, कला, व्यवस्थापन या शाखा निवडू शकता; पण दुसऱ्या वर्षी अंतिम निर्णय घ्यावा लागतो.

परदेशात शिका 
अमेरिकेत महाविद्यालयात पदवी मिळवण्यासाठी बारावीनंतर एसएटी परीक्षा पूर्ण कराव्या लागतात. येथे पदवीसाठी पहिल्या वर्षी तुम्ही अभियांत्रिकी, वैद्यकीय, कला, व्यवस्थापन या शाखा निवडू शकता; पण दुसऱ्या वर्षी अंतिम निर्णय घ्यावा लागतो. त्यासाठी महाविद्यालयात गाइड असतात. ते स्वतः प्रोफेसर असतात. विद्यार्थी एक मुख्य विषय घेऊन व एक मायनर विषय घेऊन पदवी पूर्ण करू शकतो. त्यासाठी एकशे तीस ते एकशे पन्नास क्रेडिट पूर्ण करावे लागतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंजिनिअरिंग, बिझनेस, फार्मासाठी चार वर्षे शिक्षण घ्यावे लागते. बॅचलर इन सायन्स पूर्ण केल्यानंतर मेडिकल कॉलेजसाठी ॲडमिशन मिळते. त्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. त्याचे क्लासेसही आहेत. वैद्यकीय शाखेतील पहिली चार वर्षे बॅचलर्स, मग मुख्य मेडिकल चार वर्षे, मग पदव्युत्तर शिक्षण सुरू होते.

हेही वाचा :  मुलांनो 2020 आलंय; करिअर घडविण्यासाठी हे कराच!

कॉलेजची ॲडमिशन कोठलीही एजंट, एजन्सीतर्फे करू नका. कोणाच्याही ओळखीने, चिठ्ठीने ॲडमिशन मिळत नाही, संपूर्ण प्रक्रिया गुणवत्तेवर आधारित आहे. ॲडमिशनसाठी कुठल्याही कॉलेजच्या वेबसाइट वरून माहिती मिळवू शकता. अमेरिकेत शैक्षणिक कर्ज खूप महाग आहे. त्यामुळे भारतीय बँकेकडूनच कर्ज काढावे. अमेरिकेत पदवीसाठी विविध विषय व संधी भरपूर आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी पदवी मिळविणे खर्चीक आहे. स्थानिक विद्यार्थीही खूप पैसे देऊन शिक्षण पूर्ण करतात. त्यासाठी मे ते ऑगस्ट ‘कमवा व शिका’ या तत्त्वावर नोकरी करून फीचे पैसे मिळवतात. आपण पुढील लेखात अजून विस्ताराने फक्त मास्टर्स डिग्रीबद्दल माहिती घेऊयात.

(लेखक १९९० पासून पास्यबी येथे असून, गेली दहा वर्षे अमेरिकन सरकारमध्ये काम करीत आहेत).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vilas Savargaonkar article about Learn Abroad