'एल-1' व्हिसा मिळविताना...

विलास सावरगावकर
Thursday, 19 March 2020

आपण ‘एल १’ व्हिसाबद्दल माहिती घेणार आहोत. हा व्हिसा इंटरकंपनी मॅनेजर व इंटरकंपनी वर्कर असा असतो. या प्रकारच्या व्हिसासाठी आपल्या कंपनीची कार्यालये भारत व अमेरिका या दोन्ही देशांत असणे अपेक्षित आहे.

परदेशात शिका : 

नमस्कार मित्रांनो, आज आपण ‘एल १’ व्हिसाबद्दल माहिती घेणार आहोत. हा व्हिसा इंटरकंपनी मॅनेजर व इंटरकंपनी वर्कर असा असतो. या प्रकारच्या व्हिसासाठी आपल्या कंपनीची कार्यालये भारत व अमेरिका या दोन्ही देशांत असणे अपेक्षित आहे. आपण भारतीय कंपनीमध्ये कमीत कमी दोन वर्षे काम करत असले पाहिजे, मग आपली मुख्य कंपनी आपल्याला अमेरिकेतील तिच्या संलग्न कंपनीकडे ट्रान्सफर करू शकते.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आपण मॅनेजर म्हणून काम केले असेल व काही लोक आपणास रिपोर्ट करत असतील, (डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट रिपोर्ट करत असतील, तरी चालेल.) तर आपणास ‘एल १ ए’  व्हिसा मिळू शकतो. आपणास त्यासाठी आधी ‘L1 blanket petition’ मंजूर करून घ्यावे लागते. या व्हिसाचे फायदे असे आहेत, की आपल्याला कुटुंबाचे वर्क परमिट लगेच मिळते, आपणास ग्रीन कार्ड लवकर मिळू शकते.

दुसरा प्रकार असा आहे की, आपणास ‘एल १ बी’ आहे. यातही आपणास लवकर ग्रीन कार्ड मिळू शकते. मात्र, आपणास मॅनेजरऐवजी टेक्निकल एक्स्पर्ट म्हणून काम करता येते. यातही आपल्या कुटुंबाला वर्क परमिट लगेच मिळते. या दोन्ही प्रकारांत व्हिसासाठीची मुलाखत खूप कठीण असते. खूप तयारी करावी लागते. आपल्या कामाची, शिक्षणाची चांगली माहिती असणे महत्त्वाचे आहे. आपली कंपनीची आर्थिक परिस्थिती चांगली असणे गरजेचे आहे. आपल्याकडील अनेक कंपन्यांची अशी ड्यूएल ऑफिसेस आहेत. आपण त्याचा योग्य फायदा करून घेऊ शकतो. आपण शिक्षण व अनुभवाची चांगली सांगड घालू शकतो. पुढील लेखात आणखी सविस्तर माहिती घेऊयात.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vilas savargaonkar article L-1 visa

Tags
टॉपिकस