रि-स्किलिंग : नोकरीत प्रोॲक्टिव्ह राहायचं कसं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Call to Action

रि-स्किलिंग : नोकरीत प्रोॲक्टिव्ह राहायचं कसं?

आम्ही तर आमच्या परीनं पाहिजे तेवढं काम करतच असतो. उलट बॉस जे जे काम सांगतो, ते ते सारं करतच असतो, मग आणखी प्रोॲक्टिव्ह व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं?’ अनेक जणांना हा प्रश्न नेहमी पडतो. बऱ्याच जणांच्या आयुष्यात हा शब्द नोकरीला लागल्यावर एकदमच शिरतो. मग अनेकांना ऑफिसमध्ये ऐकावं लागतं, की तुम्ही प्रोॲक्टिव्ह नाही, म्हणून तुम्हाला यंदा काही पगारवाढ नाही. त्याआधीही कॉलेजात प्राध्यापकांनीही त्यांना असे टोमणे येता जाता मारलेले असतात, पण दुर्लक्ष केल्यानं ही वेळ ओढावते, एवढंच.

तर प्रोॲक्टिव्ह असणं म्हणजे नेमकं काय? खरं सांगायचं तर हा एक साधा प्रश्न असून, तो एखाद्या मोठ्या समस्येत परावर्तित होण्याच्या आधी पावले उचलायला हवीत. तो प्रश्न सोडवायची प्रक्रिया सुरू करायला हवी. उदाहरणार्थ, आपल्या आयुष्यात खूप प्रश्न आणि समस्या असतात, असं नाही. मात्र, या छोट्या छोट्या समस्या अनेकदा मोठ्या समस्येत परावर्तित होतात. उद्या विजेची बिलं भरायची शेवटची तारीख आहे. विजेचं बिल टेबलावर पाच-सहा दिवसांपासून पडून आहे. त्यात उद्या रविवार. बिल भरायचा आज शेवटचा दिवस. आपण निदान घरच्यांना आठवण करून द्यायला पाहिजे, नाहीतर स्वत: तरी भरून टाकायला पाहिजे. नेट बॅँकिंग आहेच ना, मोबाईलवर, ते वापरता येतं. थोडक्यात काय, स्वत:हून बिल भरणं म्हणजे प्रोॲक्टिव्हनेस. आईची किंवा बायकोची नजर पडल्यावर, तिनं चार वेळा बजावल्यावर ते भरणं याला म्हणायचं, रिॲक्टिव्ह ॲप्रोच, थोडक्यात सांगकामेपणा. तो कुणालाच आवडत नसतो.

अशी बरीच उदाहरणे ऑफिसमध्ये घडत असतात. आपल्याला माहीत आहे, की एखाद्या मशिनवर काहीतरी प्रॉब्लेम आहे पण आपण तो सोडवत नाही. ते माझे काम नाही, असे गृहीत धरतो किंवा रोज जाताना आपल्याला एखादा लाइट गेलेला असतो आपण त्याकडं लक्ष देत नाही. कामाच्या जागी एखादी असुरक्षित परिस्थिती असते, ती परिस्थिती आपण योग्यवेळी रिपोर्ट करत नाही. ही असुरक्षित परिस्थिती मोठ्या अपघातामध्ये मध्ये रूपांतरित होऊ शकते, हे आपण विसरून जातो.

हा प्रोॲक्टिव्ह शब्द जरी आपल्याला खूप वेगळा वाटत असला तरी प्रत्यक्षात प्रोॲक्टिव्ह असणं फारसं कठीण नाही. आजूबाजूला, समाजात, कामाच्या जागी, सगळीकडंच बारकाईनं नजर फिरवली, तर तुम्हाला बरंचसं करण्यासारखं दिसू शकेल.

Web Title: Vinod Bidwaik Writes About How To Be Proactive In The

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :jobVinod Bidwaik
go to top