रि-स्किलिंग : आकलनशक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रि-स्किलिंग : आकलनशक्ती
रि-स्किलिंग : आकलनशक्ती

रि-स्किलिंग : आकलनशक्ती

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आकलनशक्ती महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, ह्यामध्ये वाचणे, शिकणे, समजून घेणे, लक्षात ठेवणे, गरज पडल्यास योग्य कसोट्या वापरून स्पष्टीकरण देणे, प्रश्न विचारणे, एकाग्रता मिळवणे इत्यादी गोष्टी येतात. सारासार विचार केल्यास ही सर्व कौशल्ये आहेत. कामाच्या ठिकाणी हीच साधी कौशल्ये प्रभावीपणे वापरता आली पाहिजेत. संस्थेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, डेटाचा प्रभावीपणे अर्थ लावण्यासाठी ही सर्व कौशल्ये आवश्यक असतात. यापैकी एखादे कौशल्य कमकुवत असल्यास; त्याचा परिणाम आपल्या कार्यक्षमतेवर होऊ शकतो.

आवश्यक असणारे ज्ञान कमावताना अथवा त्या ज्ञानाचा उपयोग करताना, आपली आकलनशक्ती सतत कार्य करत असते. आकलनशक्तीतील एखादे कौशल्य कमकुवत असेल, तर त्याचा प्रभाव इतर कौशल्यावर पडत असतो. ग्रहण केलेले ज्ञान टिकवून अथवा वापरण्यावर बंधने येऊ शकतात. उदा. जर संस्थेमधील रिपोर्ट वाचत असताना तुम्हाला त्यातील डेटा समजला नसेल, तर त्याचा परिणाम तुमच्या निर्णय क्षमतेवर पडू शकतो. किंवा तुमचे वाचन योग्य नसेल तर तो रिपोर्ट समजायला जड जाईल आणि त्याचा परिणाम तुमच्या आकलनशक्तीवर पडू शकेल.

लक्ष केंद्रित करा

आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे बघताना त्या घटनांचे विश्लेषण करणे, त्यानंतर त्यावर योग्य प्रतिक्रिया देणे, हाही आकलनशक्तीचा महत्त्वाचा भाग आहे. ह्या घटनांतून आपण काहीतरी शिकत असतो. आकलनशक्ती सतत काहीतरी शोधात असते, परंतु हे शिकत असताना योग्य प्रत्येक गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे आकलनशक्तीच्या वाढीस हातभार लावते. त्यामुळे एकाग्रता हेही आकलनशक्तीमधील महत्त्वाचे कौशल्य आहे. इतर व्यत्यय आणणारे ट्रिगर असले तरीही, एखादे कार्य पूर्ण करणे आणि क्रियाकल्पावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक ठरते.

माहितीचे विश्‍लेषण करा

वेगवेगळ्या मार्गाने येणाऱ्या माहितीचे विश्लेषण करून त्याचा योग्य तो अर्थ लावणे हा आता कामाचा एक भाग आहे. अगदी सॉफ्टवेअर अभियंत्यापासून मशिनवर काम करणाऱ्या तंत्रज्ञांपर्यंत सर्वाना हे कौशल्य गरजेचे आहे. डेटामधील ट्रेंड आणि सुसंगततेची स्वयंचलित ओळख म्हणजे पॅटर्न समजून घेणे. पॅटर्न शोधणे आणि प्रेरक युक्तिवाद ही मानवी मेंदूची केवळ पॅटर्न शोधण्याची नसून, या पॅटर्नचा अर्थ काय आहे याचा तर्कशुद्ध पद्धतीने विचार करण्याची क्षमता आहे.

सर्वसाधारण संदर्भात, कोणत्याही अनुभवजन्य चौकशीचा पाया आहे. निरीक्षण, वाचन आणि घटना ह्या विविध मार्गाने आपण आपले अनुभवविश्व समृद्ध करीत असतात, त्यामुळे काही वाचले असल्यास त्याचा उपयोग प्रत्यक्ष आयुष्यात करावयाचा असेल, तर वाचलेले मुद्दे योग्य वेळी आठवायला हवेत.

दैनंदिन जीवनात आकलनशक्तीचे महत्त्वाचे कौशल्य समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. मूलभूत कृतींपासून जटिल समस्या सोडवण्याचे सामर्थ्य आकलनशक्तीमध्ये आहे. ही सर्व कौशल्य तशी साधी वाटतात, पण करिअरमध्ये अतिशय महत्त्वाची ठरतात.

टॅग्स :Vinod Bidwaik