Career Opportunity : बारावीनंतर वेतनासह व्यावसायिक पदवी शिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संधी करिअरच्या... : बारावीनंतर वेतनासह व्यावसायिक पदवी शिक्षण
संधी करिअरच्या... : बारावीनंतर वेतनासह व्यावसायिक पदवी शिक्षण

संधी करिअरच्या... : बारावीनंतर वेतनासह व्यावसायिक पदवी शिक्षण

sakal_logo
By
विवेक वेलणकर

आर्थिक कुवत नसणे वा बारावीला व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशासाठी पुरेसे गुण नसणे, या कारणांमुळे विद्यार्थी या क्षेत्रापासून वंचित राहू नये यासाठी ‘महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन’ या संस्थेने तीन प्रकारचे वेतनासह पदवी अभ्यासक्रम गेल्या दहा वर्षांपासून सुरू केले आहेत. यात विद्यार्थी तीन वर्षे संगणक कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेत घेत शिकतात. त्याबरोबर विद्यावेतन मिळवतात आणि त्याचबरोबरीने मुक्त विद्यापीठाचा पदवी अभ्यासक्रम ही पूर्ण करतात. ज्यामुळे विद्यार्थी पदवीधर तर होतातच पण त्याच बरोबरीने तीन वर्षांचा अनुभव पण मिळवत असल्याने रोजगारक्षमही होतात. शिवाय पदवी मिळत असल्याने पदवीनंतर चे एमबीए पासून स्पर्धा परीक्षांपर्यंतचे सर्व पर्याय त्यांना खुले राहतात. हा शिक्षणक्रम तीन वर्ष कालावधीचे आहेत आणि सत्र पद्धतीत राबविले जातात. प्रत्येक शैक्षणिक वर्ष दोन सत्रात विभागलेले आहे. विद्यापीठाकडून सत्र परीक्षा घेण्यात येतात. कोर्सेस पुढीलप्रमाणे...

बीबीए (Services Management)

 • ज्यांना सतत वाढणाऱ्या सेवा उद्योगात उज्ज्वल करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त आहे.

 • ‘जीडीपी’मध्ये भरीव योगदान देणाऱ्या भारतातील सेवा क्षेत्राला दर्जेदार मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी हा पदवी अभ्यासक्रम उपयुक्त आहे.

 • या अभ्यासक्रमासाठी वर्षातून दोनदा (जून व डिसेंबर) ऑनलाइन प्रवेश परीक्षा होते. हा कोर्स इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचा आहे.

 • मुख्य प्रवेश परीक्षेआधी सर्वांना एक मॉक परीक्षा दिली जाते ज्यातून उमेदवारांना परीक्षेचे स्वरूप लक्षात येते आणि मुख्य परीक्षा देणे सोपे जाते. अधिक माहितीसाठी ignou.mkcl.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

बीएससी (Computer System Administration)

 • आयटी पायाभूत सुविधा आणि सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये उज्ज्वल करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण इच्छुक व्यावसायिकांसाठी हा कार्यक्रम खास तयार केला आहे.

 • हे शिकणाऱ्याला डेस्कटॉप तंत्रज्ञ/आयटी सपोर्ट अभियंता/सिस्टम प्रशासक/सुरक्षा किंवा डेटाबेस प्रशासक इत्यादी म्हणून वास्तविक IT पायाभूत सुविधा आणि समर्थन उद्योगात तीन वर्षे काम करण्यास सक्षम करेल आणि त्याच वेळी संगणक प्रणाली प्रशासनात अर्थपूर्ण आणि संबंधित पदवी मिळवून देईल.

 • संगणक, लॅपटॉप, गॅझेट्स, नेटवर्किंग, सर्व्हर, सॉफ्टवेअर आणि अशा अनेक गोष्टींचा समावेश असलेल्या आयटी पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन करू शकतील अशी कौशल्ये आत्मसात केल्याने हे विद्यार्थी रोजगार व स्वयंरोजगार दोन्ही साठी सक्षम होतील.

 • यासाठीची ऑनलाइन प्रवेश परीक्षा वर्षातून एकदा जुलैमध्ये असते. हा कोर्स यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा आहे. अधिक माहितीसाठी mfs.mkcl.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

बीबीए ( Business Process Management)

 • या शिक्षणक्रमामध्ये विद्यार्थ्यांना ITES क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये शिकण्याची व तेही मोठ्या शहरांत स्थलांतरित न होता व्यावसायिक पदवीधर होण्याची संधी मिळणार आहे.

 • जे विद्यार्थी गावात राहून छोटी मोठी नोकरी व्यवसाय करतायत त्यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त आहे.

 • यासाठीची ऑनलाइन प्रवेश परीक्षा वर्षातून एकदा जुलैमध्ये असते.अधिक माहितीसाठी ybba.mkcl.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. कोर्स यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा आहे.

loading image
go to top