संधी करिअरच्या : दहावीनंतर शाखा निवडताना

विवेक वेलणकर
Wednesday, 13 January 2021

दहावीनंतर पुढे काय करायचे याचे. अजूनही अनेक पालक, विद्यार्थी हा निर्णय दहावीला किती गुण मिळाले यावर घेतात. दहावीनंतर शाखानिवड करावी तरी कशी याचे उत्तर आपण पुढील भागात घेणार आहोत. 

दहावीचं निम्मं वर्ष सरल्यावर पालक आणि विद्यार्थ्यांना वेध लागतात दहावीनंतर पुढे काय करायचे याचे. अजूनही अनेक पालक, विद्यार्थी हा निर्णय दहावीला किती गुण मिळाले यावर घेतात. मग ७५-८० टक्के गुण मिळाल्यास विज्ञान शाखा, ७०-८० टक्के मिळाल्यास वाणिज्य आणि त्याहून कमी मिळाल्यास कला, होम सायन्स, आयटीआयची निवड केली जाते. दहावीला घोकंपट्टी, प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव यांमुळेही चांगले गुण मिळू शकतात आणि शाखानिवड चुकते. केवळ ऐंशी टक्के मार्क मिळाले म्हणून शास्त्र शाखेत प्रवेश घेणे योग्य नाही, पण अनेकदा इतके चांगले मार्क मिळालेत तेथेच प्रवेश घेण्याचे दडपण पालक, शिक्षक, नातेवाईक, शेजारी, मित्रमैत्रिणी यांच्याकडून आणले जाते. मात्र, पाय पक्का नसल्याने अकरावी, बारावी जड जाऊ शकते. मिळालेले मार्क, विषयांचे परिपूर्ण आकलन व आवड यांचा थेट संबंध असतोच असे नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की विद्यार्थ्यांना स्वतःला मनातून नक्की माहिती असते दहावीपर्यंत आपल्याला कुठले विषय आवडले, समजले, झेपले आणि कुठले विषय आवडले नाहीत, समजले नाहीत, झेपले नाहीत. आपण कोणत्या विषयात न समजता रेटून पाठांतराच्या जोरावर मार्क मिळवले आहेत. फक्त ही गोष्ट उघड बोलून दाखवण्याचे धाडस ते करू शकत नाहीत आणि त्या विषयात उत्तम मार्क मिळाल्यावर तर नाहीच नाही! आणि मग मार्कांच्या आधारे निर्णय घेतला जातो. अजून एका प्रकारे विद्यार्थी दहावीनंतर शाखा निवडीचा निर्णय करतात, तो म्हणजे आपले जवळचे मित्र-मैत्रिणी जी शाखा निवडतात, तीच शाखा आपण निवडायची. ही अत्यंत अशास्त्रीय पद्धत आहे आणि यापद्धतीने घेतलेला निर्णय अनेकदा चुकतोच. दर वर्षी अशा शेकडो केसेस अकरावी, बारावीनंतर माझ्याकडे येतात, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि आयुष्यातील मोलाचा वेळ वाया जातो. या सगळ्याचा अर्थ स्पष्ट आहे, की मार्क किती मिळाले याआधारे किंवा मित्र-मैत्रिणी काय निवड करतात या आधारे दहावीनंतर शाखा निवड करणे अशास्त्रीय व धोक्याचे आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दहावीनंतर शाखानिवड करावी तरी कशी याचे उत्तर आपण पुढील भागात घेणार आहोत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vivek Velankar write article about Opportunity career after SSC

Tags
टॉपिकस
Topic Tags: