बॅंकेत नोकरी हवीये? मग अशी करा तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Exam Prepare
बॅंकेत नोकरी हवीये? मग अशी करा तयारी

बॅंकेत नोकरी हवीये? मग अशी करा तयारी

पुणे - बॅंकिंग क्षेत्रात (Banking Field) करिअर (Career) करायचे आहे. नोकरी (Job) मिळविण्यासाठी काय करावे? असा जर प्रश्न पडला असेल, तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. गेल्या काही वर्षांत राष्ट्रीयीकृत बँकांनी (Nationalise Bank) आपली कामगिरी टिकवून आणि आपला व्यवसाय वाढवला. त्यामुळे या बँकांमध्ये सध्या नोकऱ्यांच्या उत्तम संधी निर्माण झाल्या आहेत. दरवर्षी विविध बॅंकेच्या रिक्त पदांसाठी भरती (Recruitment) जाहीर होत असते. त्यामुळे कमी वेळेत सरावाने बॅंकेच्या विविध पदांवर निवड होऊ शकते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), महाराष्‍ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) या परीक्षांनंतर बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर होण्याची बऱ्याच तरुणांची आकांक्षा असते. राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये विविध पदांसाठी हजारो करिअरच्या संधी निर्माण झाल्या आहेत. तसेच येत्या काही वर्षांत हे चित्र कायम असणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांना ही परीक्षा देता येते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

कोण घेते परीक्षा?

 • इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) ही संस्था

 • तसेच काही बँका स्वतः परीक्षा घेतात

 • www.ibps.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येतो.

कोणत्या पदांसाठी?

 • लिपिक परीक्षा, प्रोबेशनरी ऑफिसर, स्पेशालिस्ट ऑफिसर

 • दरवर्षी देशात एक ते दीड लाख पदांसाठी होते भरती

परीक्षा कधी होते?

 • स्टेट बँक ऑफ इंडिया व त्यांच्या सहयोगी बँकेतील पदांसाठी परीक्षा एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान

 • आयबीपीएसची परीक्षा ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान

 • इतर बँकांच्या परीक्षा वर्षभरात त्यांच्या जाहिरातीनुसार होतात

निवड प्रक्रिया पूर्व परीक्षा : १०० गुण

 • प्रश्नपत्रिकेचे स्वरूप : वस्तुनिष्ठ (ऑनलाइन)

 • परीक्षेचे विषय : इंग्रजी, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड, टेस्ट ऑफ रिझनिंग

 • पूर्व परीक्षेतून एकूण जागांच्या २० पट उमेदवारांची निवड मुख्य परीक्षेसाठी केली जाते.

मुख्य परीक्षा : २०० गुण

 • प्रश्नपत्रिकेचे स्वरूप : वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (ऑनलाइन)

 • परीक्षेचे विषय : इंग्रजी भाषा, सामान्यज्ञान, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड, टेस्ट ऑफ रिझनिंग, कॉम्प्युटर नॉलेज,

 • पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश म्हणजेच ०.२५ इतके गुण कमी केले जातात.

मुलाखत : १०० गुण

 • खुल्या वर्गातील उमेदवाराला मुलाखतीमध्ये किमान ४० टक्के गुण आवश्यक

 • राखीव वर्गातील उमेदवाराला किमान ३५ टक्के गुण आवश्यक

अंतिम निवड

मुख्य परीक्षेतील गुणांना ८० टक्के वेटेज असेल तर मुलाखतीतील गुणांना २० टक्के वेटेज असेल. मुख्य परीक्षा व मुलाखतीतील एकत्रित गुणांनुसार उमेदवारांची निवड केली जाते.

बारावीनंतर अभ्यास सुरू केला, तर तीन वर्षे अभ्यासासाठी वेळ मिळतो. त्यामुळे पदवीनंतर लगेच चांगल्या पगाराची नोकरी मिळवता येते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षांबद्दलचे आकर्षण वाढत आहे. या परीक्षेत हुशारीबरोबरच सरावात सातत्य ठेवल्याने यश मिळवता येते. सर्वसामान्य विद्यार्थ्यांनादेखील यश मिळवता येते.

- अक्षय भिसे, मार्गदर्शक

दरवर्षी विविध बॅंकांतील रिक्तपदांसाठी जाहिरात प्रसिद्ध होत असते. त्यामुळे परीक्षा होणार याची खात्री असते. त्यानुसार विद्यार्थ्यांना तयारी करता येते. ठरावीक काळात परीक्षा होत असल्याने याचा मोठा फायदा होतो. बँकेच्या परीक्षांच्या अभ्यासाच्या जोरावर रेल्वे, एलआयसी आदी विभागांतील परीक्षा देण्यासाठी वेगळा अभ्यास करण्याची आवश्यकता नसते.

- ओमकार लकारे, मार्गदर्शक

पदवीनंतर प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी तयारी करायची हे ठरवले होते. त्यानुसार नियोजन केले. सुरवातीला अपयशाचा सामना करावा लागला. मात्र, दोन ते अडीच वर्षांत यश मिळाले. मुख्यतः इंग्रजी भाषेवर लक्ष केंद्रित करावे लागले. तर गणित, बुद्धिमत्ता या विषयांचा सातत्याने सराव केला. सरावामध्ये खंड पडू दिला नाही. त्यामुळे चांगले गुण मिळाले.

- प्रभू इनामके, प्रोबेशनरी ऑफिसर

Web Title: Want A Job At A Bank Then Prepare To Do So

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bankeducationjob
go to top