esakal | पुणे: कोरोनाच्या काळात IT सेक्टरमध्ये नोकरीच्या संधीमध्ये प्रंचड वाढ का झालीय?
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे: IT सेक्टरमध्ये नोकरीच्या संधीमध्ये प्रंचड वाढ का झालीय?

पुणे: IT सेक्टरमध्ये नोकरीच्या संधीमध्ये प्रंचड वाढ का झालीय?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांसंदर्भातला एक महत्त्वाचा रिपोर्ट Quess या बिझनेस सोल्यूशन प्रोव्हायडर संस्थेनी दिला आहे. या रिपोर्टनुसार, सध्या ज्याला ‘Great Resignation’ कालावधी म्हणून संबोधलं जाऊ शकतं, असा काळ सुरु आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सध्या वाढत चाललेल्या टॅलेंटच्या मागणीमुळे मागणी आणि पुरवठ्याचा समतोल बिघडला आहे. त्यामुळे कंपन्यांना स्वत:च्या वाढीसाठी सातत्याने नवं टॅलेंट शोधणं आणि आहे ते टॅलेंट टिकवून ठेवणं गरजेचं बनलं आहे.

हेही वाचा: धारावीच्या जान मोहम्मदचे 'दाऊद'शी जुने संबंध - ATS प्रमुख

सध्या आयटी क्षेत्रातील नोकऱ्या सर्वोच्च स्थानी आहेत. तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल मात्र, कोरोनानंतरच्या काळात सुद्धा स्कील्ड आणि टॅलेंटेड लोकांची मागणी 52 टक्क्यांनी वाढलेली आहे. Quess द्वारे संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, जून 2021 मध्ये, आयटी क्षेत्रातील नोकर भरतीमध्ये प्रतिवर्ष (YoY) 163 टक्क्यांची वाढ झाली आहे.

बंगलुरु, पुणे आणि हैद्राबाद यासारख्या शहरांमध्ये ज्याठिकाणी मोठमोठ्या प्रमुख आयटी कंपन्या वसलेल्या आहेत त्याठिकाणी नोकरभरतीच्या प्रक्रियेमध्ये मोठी उलाढाल पहायला मिळत आहे. तब्बल दोन अंकी वाढ या नोकरभरतीमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर असलेली टॅलेंटच्या मागणीची गरज यातून स्पष्टपणे दिसून येत आहे.

हेही वाचा: दाभोलकर हत्या प्रकरण : दोषारोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण

सध्या रिमोट टॅलेंटच्या वाढत्या गरजेमुळे अनेक कंपन्या फिलिपिन्स, व्हिएतनाम आणि श्रीलंका यांसारख्या इतर APAC देशांमध्ये नोकर भरतीचा शोध घेण्यासाठी भारतीय सीमेपलीकडे पावलं टाकत आहेत, असं Quess IT Staffing चे सीईओ विजय शिवराम यांनी हायरिंग ट्रेंड्सच्या रिपोर्ट्समध्ये म्हटलंय.

मार्च-ऑगस्ट 2021 दरम्यानच्या कालावधीमध्ये, हायरिंग डेटावरून असं दिसून येतंय की Full Stack, React JS, Android, Angular JS आणि Cloud Infrastructure Technologies, Cyber Security यासारख्या डिजिटल स्कील्ससह टॅलेंटची मागणी वाढली आहे. ऑक्टोबर-मार्च 2020-2021 पासून technology transformations हा अनेक कंपन्यांसाठी प्रमुख प्राधान्यक्रम बनला आहे.

loading image
go to top