esakal | धारावीच्या जान मोहम्मदचे 'दाऊद'शी जुने संबंध; ATS प्रमुखांनी दिली सविस्तर माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

धारावीच्या जान मोहम्मदचे 'दाऊद'शी जुने संबंध - ATS प्रमुख

धारावीच्या जान मोहम्मदचे 'दाऊद'शी जुने संबंध - ATS प्रमुख

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई: एटीएस प्रमुखांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. एटीएसचे प्रमुख विनीत अग्रवाल यांनी या पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. काल दिल्ली पोलिसांकडून दहशतवादी कटाच्या कारस्थान प्रकरणी 6 लोकांना अटक करण्यात आली होती. या सहा जणांपैकी एक जण हा धारावीचा आहे. जान मोहम्मद असं त्याचं नाव आहे. त्याच्याबद्दल त्यांनी यामध्ये माहिती दिली आहे. हे प्रकरण दिल्ली पोलिसांनी उघड केल्यामुळे दिल्ली पोलिसांना त्याबाबत अधिक माहिती आहे. या प्रकरणी आम्ही दिल्ली पोलिसांना सर्वतोपरी मदत करत आहोत. त्यासंदर्भातच, महाराष्ट्र एटीएसचं एक पथक आज सायंकाळी दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

हेही वाचा: दाभोलकर हत्या प्रकरण : दोषारोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण

दाऊदशी जानचे जुने संबंध

जान मोहम्मदबाबत माहिती देताना त्यांनी म्हटलंय की, त्याच्यावर एटीएसची बारीक नजर होती. तसेच त्याचे 20 वर्षांपासून दाऊदशी जुने संबंध होते. सध्या त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. तो धारावीच्या झोपडपट्टीत रहायचा. 13 तारखेला तो दिल्लीला जाणार होता. तिकीट उपलब्ध नसल्यामुळे रेल्वेमधून तात्काळने जाण्याचं नियोजन केलं. आरोपी गोल्डन टेम्पल ट्रेनने दिल्लीला रवाना झाला होता. जान मोहम्मद अली महम्मद शेखला रेल्वे राजस्थानमधील कोट्यामध्ये अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: गुजरात मंत्रिमंडळात होणार मोठे बदल, 21 दिग्गज नेत्यांना मिळणार डच्चू?

मुंबई एटीएसचं पथक जाणार दिल्लीला

धारावीत राहत होता. त्याचे दाऊदशी संबंध असल्याचं २० वर्षापूर्वीचं रेकॉर्ड आहे. आमच्या नजरेत तो होता. ९ तारखेला दिल्लीला जाण्याचा प्रयत्न होता. दहा तारखेला पैसेही पाठवले पण त्याचं कन्फर्म झालं नाही. १३ तारखेचं तिकिट घेतलं. एकटा निजामुद्दीनसाठी गेला. वाटेत कोटामधून अटक करण्यात आली. त्याचकडे काही शस्त्रे किंवा स्फोटके मिळाली नाहीत. जी काही माहिती होती ती दिल्ली पोलिसांना मिळाली. आज आमचे पथक दिल्लीला जाईल. आमचे पोलिस त्यांना हवी असलेली माहिती देतील.

loading image
go to top