
- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक
नहाए धोए का आया, जो मन मैल ना जाये ।
मीन सदा जल में रहे, धोए बांस न जाये ।।
- कबीर
एक प्रसिद्ध भावगीत आहे. ‘मनाच्या धुंदीत, लहरीत ये ना...’ वगैरे वगैरे. कवी सखीला असे यायला सांगतोय, परंतु मनही असेच सखीसारखे, धुंदीत असते आणि लहरी वागते ना? आणि आजकाल मन जास्तच बेदरकारपणे वागायला लागले आहे. ते सखीचे तसे वगैरे वागणे, एकवेळ कळू शकते, प्रसंगी समजू शकते, सहनही करता येईल. परंतु मन अनियंत्रित होणे कसे परवडेल? संबंधित व्यक्तीला आणि व्यक्तींनी बनलेल्या समूहाला, झेपणारही नाही.