परदेशात शिकताना... : ‘इंडस्ट्री ४.०’ च्या दिशेने जाताना!

जागतिक परिस्थिती सातत्याने बदलत असून, आता ‘इंडस्ट्री ४.०च्या’ दिशेने वाटचाल करीत आहे.
परदेशात शिकताना... : ‘इंडस्ट्री ४.०’ च्या दिशेने जाताना!

आजची इंडस्ट्री आपल्या प्रक्रिया पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी अभियंत्यांकडून मोठ्या योग्यतेची मागणी करते, डेटाचे पृथक्करण करून आपली व्यावसायिक उद्दिष्टे पूर्ण करण्यात कोणतीही कमतरता राहणार नाही, याचीही काळजी घेते. तंत्रज्ञानाचा परीघ आता सर्वच क्षेत्रांत विस्तारला असून, तो उत्पादन, सेवा, पॅकेजिंग, ट्रान्स्पोट्रेशन, औषध निर्मिती आणि संरक्षण क्षेत्रालाही आपल्यात सामावून घेतो आहे. जागतिक परिस्थिती सातत्याने बदलत असून, आता ‘इंडस्ट्री ४.०च्या’ दिशेने वाटचाल करीत आहे.

त्यासाठी विशिष्ट शाखेतील सर्वोत्तम सादर करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी डेटावर आधारित कार्यप्रणाली लागू करावी लागत असून, ते गुंतागुंतीच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून असल्याने कर्मचाऱ्यांकडून सखोल कल्पनाशक्तीची अपेक्षा केली जाते आहे.

त्यामुळेच ‘ऑपरेशन्स रिसर्च’ या शाखेतील नवी पिढी उदयास येत असल्याचे पाहात आहोत. उदा. बुककीपिंगची एक पद्धत असलेल्या ‘ब्लॉकचेन’सारख्या तंत्रज्ञानात पुस्तकांच्या नोंदणीची साखळी तयार केली जाते व ती नंतर बदलणे दुरापास्त असते. किंवा मॅथेमॅटिक मॉडेलिंगमधील उत्तरे शोधणारी प्रोग्रॅमिंग लॅग्वेज व त्याचा उद्योगातील सर्वोत्तमीकरणासाठीचा उपयोग व मर्यादांची माहिती असलेल्या तज्ज्ञाची मागणी उद्योगांकडून केली जाते. अशा प्रकारचे स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअरचे ज्ञान मिळविणे आणि गुंतागुंतीच्या डेटाची कल्पना करण्याचे नैपुण्य असलेल्यांना उद्योगांमध्ये आता खूप मोठी मागणी आहे. अनेक मान्यताप्राप्त विद्यापीठे आता हे अभ्यासक्रम ऑपरेशनल रिसर्चमधील इंडस्ट्रिअल ट्रेनिंग किंवा वेगळा पदवी अभ्यासक्रम म्हणून शिकवतात.

या पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मॅथेमॅटिक्सच पार्श्वभूमी व सॉफ्टवेअरमधील नैपुण्य आवश्यक ठरते. यातील ‘एमएस’ अभ्यासक्रम इंजिनिअरिंगचे विद्यार्थी पूर्ण करता, मात्र मॅथेमॅटिक्स व स्टॅटेस्टिक्समधील अद्ययावत ज्ञान असलेले विद्यार्थीही हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता. आपल्या अभ्यासाच्या क्षेत्राबाहेरचे काही करू इच्छिणाऱ्यांसाठी ही खूप वेगळी करिअर संधी आहे व या क्षेत्रात बड्या पगाराची नोकरी मिळते व तुमच्या आवडीची विविध क्षेत्रे निवडण्यासाठी संधी प्राप्त होते.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com