
Shivaji Maharaj : इयत्ता चौथीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांना अढळ स्थान कसं प्राप्त झालं ?
मुंबई : तुमचं प्राथमिक शिक्षण महाराष्ट्र बोर्डात झालं असेल तर तुम्हाला आठवत असेल की, इयत्ता चौथीत असताना इतिहास विषयाचं संपूर्ण पुस्तक शिवाजी महाराजांना समर्पित केलेलं असायचं.
शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते निधनापर्यंत त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे प्रसंग या पुस्तकात सांगितलेले होते. ते एक पुस्तक वाचलं की महाराजांचं अख्खं चरित्र कळायचं.
पुढे काळ बदलला, पिढ्या बदलल्या तसा सर्व विषयांचा अभ्यासक्रमही बदलत गेला. पण चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराज मात्र कधीच बाहेर पडले नाहीत. असं का बरं होत असेल ? (why ssc board never changes the history textbook of 4th standard which consists of shivaji maharaj life journey ) हेही वाचा - ट्रेडिंग कुठल्याही प्रकारचे असो 'स्टाॅप लाॅस' हवाच
१९९१ साली तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या कार्यकाळात चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात काही बदल करण्यात आले होते. त्यावेळी वाद निर्माण झाला होता आणि त्याची परिणती म्हणून विधिमंडळात एक ठराव झाला.
या ठरावानुसार चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास कधीच पुसला जात नाही.
१९७० साली इतिहासाच्या पुस्तकाचा अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला होता. तेव्हापासून चौथीच्या पुस्तकाचा मूळ गाभा तसाच ठेवून त्यात थोडेफार बदल करण्यात येतात. पण या पुस्तकात शिवाजी महाराजांना अढळ स्थान आहे.
चौथीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचे संपूर्ण चरित्र गोष्टीरुपात मांडण्यात आले आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळातून शिकून पुढे गेलेल्या कित्येक पिढ्यांना हे पुस्तक चांगले आठवत असेल.
बालभारतीतर्फे प्रकाशित केले जाणारे पुस्तक त्यांच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरुपात उपलब्ध आहे.