मुलाखतीनंतर का रडली होती UPSC topper श्रुती शर्मा ?

तिचे मॉक इंटरव्ह्यू खूप चांगले झाले होते; पण UPSC मुलाखतीनंतर ती तिच्या कामगिरीवर खूश नव्हती आणि यामुळे ती तिच्या पालकांसमोर रडली.
shruti sharma
shruti sharmagoogle

मुंबई : UPSC ने नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये मुलींनी टॉप ३ मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. प्रथम क्रमांक श्रुती शर्मा, द्वितीय क्रमांक अंकिता अग्रवाल, तृतीय क्रमांक गामिनी सिंगला यांनी पटकावला आहे. प्रथम आलेल्या श्रुती शर्माने जेएनयू आणि सेंट स्टीफन्समधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. परीक्षेत पहिला क्रमांक मिळाला यावर विश्वास बसत नसल्याचे ती सांगते.

shruti sharma
UPSC EXAM : राज्यातून प्रथम आलेल्या प्रियंवदा म्हाडदळकर यांची यशोगाथा

मुलाखतीनंतर नाराजी

नागरी सेवा परीक्षेत श्रुतीचा हा दुसरा प्रयत्न होता ज्यामध्ये इतिहास हा तिचा पर्यायी विषय होता. तिने सांगितले की तिचे मॉक इंटरव्ह्यू खूप चांगले झाले होते; पण UPSC मुलाखतीनंतर ती तिच्या कामगिरीवर खूश नव्हती आणि यामुळे ती तिच्या पालकांसमोर रडली. मुलाखतीत चांगले गुण मिळणार नाहीत असे तिला वाटले होते. श्रुती म्हणते, की तिला वस्तुनिष्ठ प्रश्न अधिक विचारण्यात आले होते. श्रुतीने तिला ज्या प्रश्नांची उत्तरे माहीत नव्हती त्याबाबत स्पष्ट सांगितले होते.

shruti sharma
६ वर्षे जर्मन बँकेत नोकरी करणारी प्रियंवदा आज IAS बनलीय

अभ्यासाची पद्धत महत्त्वाची

परीक्षेच्या तयारीच्या नियोजनाबद्दल श्रुती सांगते की, किती तास अभ्यास केला जात आहे हे महत्त्वाचे नाही, तर आपण कसा अभ्यास करतोय हे महत्त्वाचे आहे. तासनतास अभ्यास करणं गरजेचं आहेच, पण विश्रांती घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अभ्यास आणि विश्रांतीचा समतोल राखणे खूप महत्वाचे आहे. नियोजनपूर्वक अभ्यासाच्या बळावर परीक्षेत नक्कीच यश मिळवता येते.

UPSC परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते

UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोग दरवर्षी नागरी सेवा परीक्षा घेते. परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते. पूर्व परीक्षा, मुख्य आणि मुलाखत. पूर्व परीक्षेतील यशस्वी उमेदवार मुख्य परीक्षा देतात आणि त्यात यशस्वी झाल्यानंतर उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाते. या वर्षी जानेवारीमध्ये नागरी सेवा परीक्षा २०२१ ची मुख्य परीक्षा घेण्यात आली आणि एप्रिल-मेमध्ये निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com