Good News : TCS ब्रिटनमध्ये करणार 1,500 तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती

Satara Latest Marathi News, Satara News
Satara Latest Marathi News, Satara News

सातारा : भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर सर्व्हिसेस कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (टीसीएस) पुढील वर्षापर्यंत ब्रिटनमध्ये 1,500 तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असल्याचे कंपनीच्या व्यवस्थापनाने बुधवारी सांगितले. ब्रिटनचे व्यापारमंत्री लिझ ट्रस आणि टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन (TCS CEO Rajesh Gopinathan) यांच्यात झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

या बैठकीत दोन्ही पक्षांनी टीसीएसच्या ब्रिटन अर्थव्यवस्थेत गुंतवणुकीबरोबरच नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, विविध प्रकारची गुंतवणूक, कौशल्य आदींबाबत महत्वपूर्ण चर्चा केली. दरम्यान, कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, ब्रिटनच्या काही मोठ्या कॉर्पोरेट्सच्या वाढत्या प्रवाहात सहभाग घेऊन आणि नवीन पुढाकार, तसेच विविध सेवांसाठी मदतनीस म्हणून ब्रिटनची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर स्पर्धात्मक ठेवण्यात टीसीएस महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

ब्रिटनमधील टीसीएस कामगारांमध्ये 54 देशांचे लोक आहेत, त्यातील 28 टक्के महिला कर्मचारी आहेत. दरम्यान, या आर्थिक वर्ष 2020 च्या अखेरीस कंपनीचे ब्रिटन मार्केटमधून 2.7 अब्ज इतके उत्पन्न घेण्यात आले होते, त्यामुळे ब्रिटनची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर ठळक ठरण्यात टीसीएसचा मोठा वाटा असल्याचे कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com