YCMOU Exams | 'मुक्‍त'च्‍या परीक्षांना मंगळवारपासून सुरवात; कसे असेल स्वरुप? वाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ycm open university online exams will-be start from 8th February 2022 check all details

'मुक्‍त'च्‍या परीक्षांना मंगळवारपासून होणार सुरवात; 'असे' असेल स्वरुप

नाशिक : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या (Yashwantrao Chavan Maharashtra Open University) परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. येत्‍या मंगळवार (ता.८) पासून या परीक्षांना सुरवात होणार आहे. विविध ५६ शिक्षणक्रमांच्‍या परीक्षांना राज्‍यभरातील विद्यार्थी समोरे जाणार आहेत.

परिक्षेत गैरप्रकार आढळल्‍यास..

मुक्‍त विद्यापीठ (YCMOU) च्या परीक्षेचे स्‍वरुप ऑनलाइन असणार आहे. परीक्षेत पन्नास प्रश्‍न प्रत्‍येकी दोन गुणांसाठी विचारले जातील. त्‍यापैकी चाळीस प्रश्‍न सोडविणे बंधनकारक असेल. या परीक्षेत मिळालेल्‍या गुणांचे वर्गीकरण अंतीम परीक्षेच्‍या शीर्षाखाली ८० गुणांमध्ये दर्शविण्यात येईल. परीक्षा ऑनलाइन प्रॉक्‍टर्ड पद्धतीने होतील. विद्यार्थ्यांच्‍या प्रत्‍येक हालचालींवर सॉफ्टवेअरद्वारे, वेब कॅमेर्याद्वारे देखरेख ठेवली जाईल. गैरप्रकार आढळल्‍यास वेळोवेळी सॉफ्टवेअरद्वारे वॉर्निंग देण्यात येईल. विशिष्ट मर्यादेपेक्षा अधिकच्‍या वॉर्निंग दिल्‍यानंतर परीक्षा आपोआप बंद होऊन गैरप्रकार समितीसमोर संबंधित विद्यार्थ्यांना बोलविण्यात येईल. व विद्यापीठाच्‍या नियमांनुसार योग्‍य ती शिक्षा विद्यार्थ्यांना दिली जाईल, असे विद्यापीठातर्फे स्‍पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पेपर सोडवितांना प्रश्‍नाखाली असलेल्‍या चार पर्यायांसमोर असलेल्‍या रेडिओ बटन दाबूनच उत्तराची निवड करायची आहे. पर्यायावर टिक करुन उत्तर निवड होत नाही अन्‍यथा उत्तरे सोडविली नाही म्‍हणून शून्‍य गुण मिळतील, असे विद्यापीठातर्फे स्‍पष्ट केले आहे.

हेही वाचा: रेल्वे स्टेशनची नावे पिवळ्या बोर्डवरच का लिहीतात? जाणून घ्या खास कारण

अशा आहेत सूचना…

विद्यार्थ्यांचे फोटो सॉफ्टवेअरमध्ये अपलोड केलेले आहेत. परीक्षा सुरु करतांना विद्यार्थ्यांनी मोबाईलचे कॅमेरा फिचर ऑन ठेवावे. सिस्‍टीम आपला फोटो कॅच करुन पडताळून पाहिल व मॅच झाल्‍यास पुढे परीक्षा सुरु होईल. फोटो मॅच न झाल्‍यास परीक्षा देता येईल मात्र त्‍याची पडताळणी केली जाईल. विद्यार्थी चेहरा पडताळणी वा अन्‍य कारणांनी लॉगआउट झाल्‍यास एकूण दोन वेळा रिलॉगीन करता येईल. परीक्षा देतांना विद्यार्थ्यांव्‍यतिरिक्‍त इतर कोणीही जवळ दिसला, कॅमेरात आला, कॅमेरा बाहेरुन उत्तरे दिली त्‍याचीही नोंद सिस्‍टीमला होईल. हा गैरप्रकार गणला जाऊन त्‍यास विद्यापीठ नियमानुसार चौकशी केली जाणार असल्‍याचे विद्यापीठाने स्‍पष्ट केले आहे.

हेही वाचा: उत्तम कांबळे, डॉ. रमेश वरखेडेस यांच्यासह चौघांना राज्य वाडःमय पुरस्कार

मॉक टेस्‍ट उद्यापासून

विद्यापीठाच्‍या विविध शिक्षणक्रमांच्‍या परीक्षांसाठीची सराव चाचणी (मॉक टेस्‍ट) ची लिंक विद्यापीठ पोर्टलला एक्‍झामिनेशन टॅबमध्ये उपलब्‍ध आहे. विद्यार्थ्यांना उद्या (ता. ३) पासून सराव चाचणी देता येईल. सर्व परीक्षार्थींनी सराव चाचणी देण्यापूर्वी डेमो व्‍हिडीओ पाहावा, सूचनापत्र वाचावे, आणि सराव परीक्षा द्यावी, असे विद्यापीठातर्फे स्‍पष्ट केले आहे.

हेही वाचा: सर्वात स्वस्त 1GB डेटा; Jio, Airtel अन् BSNL पैकी बेस्ट प्लॅन कोणता?

Web Title: Ycm Open University Online Exams Will Be Start From 8th February 2022 Check All Details

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..