उत्तम कांबळे, डॉ. रमेश वरखेडेस यांच्यासह चौघांना राज्य वाडःमय पुरस्कार

Uttam Kemble Dr Ramesh Varkhede Mridula Bele and Raju Desale declared government excellent literary awards
Uttam Kemble Dr Ramesh Varkhede Mridula Bele and Raju Desale declared government excellent literary awards

नाशिक : मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाडःमय निर्मितीसाठी दिल्‍या जाणाऱ्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राज्य वाडःमय पुरस्कारांची घोषणा बुधवारी (ता.२) राज्य सरकारतर्फे करण्यात आली. पुरस्‍कारार्थींमध्ये नाशिकचे ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे (Uttam Kamble), मराठीतील समीक्षक डॉ. रमेश वरखेडे, औषधनिर्माणशास्त्रच्या प्रा. डॉ. मृदुला हेमंत बेळे, कवी राजू देसले यांचा समावेश आहे.

डॉ. वरखेडे यांना मराठी भाषा संवर्धनासाठी डॉ. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार जाहीर झाला आहे. दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र असे त्यांच्या पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ. वरखेडे हे ‘अनुष्टुभ्‘ या नियतकालिकाचे संस्थापक संपादक होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्रे या विभागाचे ते संचालक होते.

विद्यापीठाच्या ‘ज्ञानगंगोत्री‘ नियतकालिकाचे ते ९ वर्षे संपादक होते. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे राबविण्यात येत असलेल्या पुरस्कार योजनेतंर्गत २०२०-२१ साठीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्रौढ वाङःमय- राज्यशास्त्र/समाजशास्त्र प्रकारात श्री. कांबळे यांच्या मुंबईच्या लोकवाडःमय गृह प्रकाशित 'अस्वस्थ शतकातील माणगाव परिषद' या पुस्तकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळाला आहे. पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये असे आहे. राज्य सरकारचा बहिणाबाई पुरस्कार कवी देसले यांच्या कॉपर कॉइन प्रकाशित 'अवघेचि उच्चार' या कवितासंग्रहाला जाहीर झाला असून पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रुपये असे आहे. तसेच डॉ. बेळे यांच्या राजहंस प्रकाशन प्रकाशित ‘कोरोनाच्या कृष्णछायेत' या पुस्तकाला प्रौढ वाडःमय-पर्यावरण या प्रकारात डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये असे त्यांच्या पुरस्काराचे स्वरुप आहे.

Uttam Kemble Dr Ramesh Varkhede Mridula Bele and Raju Desale declared government excellent literary awards
बिटकॉईन, इथेरियम, NFT कायदेशीर होणार? अर्थ सचिवांनी केलं स्पष्ट

राज्य सरकारकडून माझ्या साहित्य कृतीला मिळालेला हा चौथा पुरस्कार आहे. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृशांची पहिली परिषद १९२० मध्ये घेतली. माणगाव परिषद डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील पहिली परिषद होती. परिषदेच्या शताब्दीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे पुरस्कार मिळाल्याने आनंद होतोय. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या प्रबोधन चळवळीला हा पुरस्कार आहे.
- उत्तम कांबळे (ज्‍येष्ठ साहित्‍यिक)

मराठीसाठी १९८९ पासून सुरु असलेले काम बरोबर होते, त्याचे प्रतीक म्हणजे पुरस्कार. पुणे विद्यापीठात व्यावहारिक मराठी हा अभ्यासक्रम सुरु झाला. त्यासाठी मराठी अन्याय परिषदेची स्थापना करण्यात आली होती. तिचा मी सचिव होतो. हा अभ्यासक्रम नंतर इतर विद्यापीठात सुरु झाला. त्यासाठीच्या समित्यांमधून काम करण्याची संधी मिळाली. पुढे समाजभाषा विज्ञान हा अभ्यासक्रम आणला. तो उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आणि नंतर इतर विद्यापीठात सुरु झाला. भाषा सल्लागार समितीत काम करत असताना भाषिक धोरण तयार करण्याचे काम मिळाले. सायबर संस्कृतीविषयक काम केले. राज्य सरकारने विज्ञान-तंत्रज्ञानमध्ये महात्मा फुले पुरस्कार दिला होता.
- डॉ. रमेश वरखेडे (समीक्षक)

Uttam Kemble Dr Ramesh Varkhede Mridula Bele and Raju Desale declared government excellent literary awards
बदल्यांची यादी मला अनिल परब द्यायचे, अनिल देशमुखांचा खुलासा

माझ्या पहिल्या ‘कथा अकलेच्या कायद्याची‘ या पुस्तकाला राज्य सरकारचा २०१७ मध्ये अर्थविषयक प्रकारात सी. डी. देशमुख पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर आता दुसऱ्या पुस्तकाला पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये दीड महिन्यात लेखन केले होते. पुरस्काराने त्या लेखनाचे चीज झाले आहे.
- प्रा. डॉ. मृदुला बेळे (लेखिका)

कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी लाख मोलाची गोष्ट आहे. बहिणाबाई यांच्या कवितेतून जगण्याचे भान देतात. त्यांच्या या कवितेतून जीवन जगण्याची मला प्रेरणा मिळाली. 'अवघेचि उच्चार' कवितासंग्रहाला राज्य सरकारचा कवियत्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार मिळणे ही माझ्या लेखन प्रवासाला बळ देणारी गोष्ट आहे.
- राजू देसले (कवी)

Uttam Kemble Dr Ramesh Varkhede Mridula Bele and Raju Desale declared government excellent literary awards
Telegram ला मिळाले आणखी नवीन फीचर्स; चॅटिंग होणार आणखी मजेशीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com