
मुक्त विद्यापीठात प्रवेशासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या (YCMOU) २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशाची प्रक्रिया सुरु आहे. विविध शिक्षणक्रमाच्या ऑनलाईन प्रवेशासाठी विनाविलंब प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठाने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार १५ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतील.
यापूर्वी ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेशाची मुदत दिलेली होती. विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झालेले आहेत. या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणक्रमास प्रवेश घेता यावा, तसेच अद्याप प्रवेश न भरलेले उर्वरित विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत, यासाठी मुक्त विद्यापीठाच्या विविध (बी.एड्. व कृषी शिक्षणक्रम वगळून) शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्याच्या ऑनलाईन प्रवेशास मुदतवाढ दिली आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली आहे.