दहावीनंतर करिअरची निवड अनेकदा समाजाचा दबाव, कुटुंबाच्या अपेक्षा, सुरक्षित मार्ग, प्रतिष्ठित करिअर, पैसा व माध्यमांतील चर्चित क्षेत्रांच्या आधारे केल्याने, खऱ्या आवड-क्षमता न ओळखता केली जाते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० जीवनकौशल्ये व व्यावसायिक शिक्षणावर भर देत असले, तरी शिक्षणपद्धती अजूनही गुणांवर भर देते व स्व-शोधाला प्राधान्य देताना दिसत नाही.