
ऐरोलीत तब्बल ९० हजारांचा लीड घेत भाजपच्या गणेश नाईक यांनी विजयी पताका फडकावले आहे. त्यांनी अपक्ष उमेदवार लक्ष्मण चौगुले आणि मनोहर मढवी यांना मोठ्या फरकाने पराभूत केलंय.
विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाल्यावर नवी मुंबई मतदारसंघ चर्चेत आला. नवी मुंबई एक नियोजनपूर्वक केलेलं शहर म्हणून प्रसिद्ध आहे. पण इथल्या राजकीय रचनेतील नियोजन यंदा काहीसं गडबडलेलं दिसलं.
नवी मुंबईवर वर्चस्व असलेल्या गणेश नाईकांच्या घरातच बंडाचे वारे वाहिले. आता ऐरोली मतदारसंघात भाजपतर्फे विद्यमान आमदार गणेश नाईक यांनी निवडणूक लढवली. त्यांच्याविरुद्ध उबाठा गटाकडून मनोहर कृष्ण मढवी उभे होते.