चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का! माजी नगरसेवकाने पक्ष ठोकला राम राम | Chinchwad By Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chinchwad By Election

चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का! माजी नगरसेवकाने पक्ष ठोकला राम राम

राज्याचं लक्ष लागून असलेल्या चिंचवड पोटनिवडणुकीत तिहेरी लढत पाहिला मिळत आहे. भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, राष्ट्रवादीकडून नाना काटे तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात लढत होत आहे.

मात्र प्रचाराला आता कुठे सुरूवात होत नाही तोवरच आज अचानक भाजपचे माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी पक्षाला रामराम केला आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडल्यामुळे भाजपला जबर धक्का बसला आहे. पक्षाला राम राम केल्यांनंतरची पुढची भुमिका काय, कुठल्या पक्षात जाणार असे विचारले असता त्याबाबतचा निर्णय दोन दिवसांत जाहीर करणार असल्याचे कामठे यांनी सांगितले आहे.

पक्ष सोडताना त्यांनी सांगितलं की, भ्रष्टाचाराविरुद्धच्या आपल्या संघर्षाला साथ न दिल्याने पक्ष सोडत असल्याचे सांगितले.

कामठे हे २०१७ ला पिंपळे निलखमधून प्रथमच निवडून आले होते. त्यांनी महापालिकेती विविध विभागातील सुरु असलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली होती.

त्यांनी भाजपच्याच महेश लांडगे आणि चिंचवडचे लक्ष्मण जगताप या आमदारांना आंगावर घेण्याचे मोठे धाडस केले होते. मात्र आता ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चावेग धरू लागल्या आहेत. त्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.

टॅग्स :BjpNCP