
डोंबिवलीय भाजपच्या रवींद्र चव्हाण यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झालाय. त्यांना तब्बल १ लाख २३ हजार ५५५ मतं मिळाली आहेत. तर त्यांचे विरोधक उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे दीपेश म्हात्रे यांना केवळ ४६ हजार ७५३ मतं मिळाली आहेत.
सांस्कृतिक राजधानी मानल्या जाणाऱ्या डोंबिवलीत भाजपचा मतदार मोठ्या संख्येने आहे. त्यामुळेच आमदार रवींद्र चव्हाण इथे सत्ता राखून होते.
मात्र महायुतीत एकत्र असले तरी मुख्यमंत्री शिंदे आणि चव्हाण यांच्यात चांगलीच धुसफूस होती.