Hukkeri Vidhansabha Constituency : हुक्केरी बालेकिल्ला अबाधित ठेवण्‍याचे आव्‍हान?

हुक्केरी विधानसभा मतदारसंघ म्हटले की, राज्यात एकच नाव चर्चेत येते ते कत्ती कुटुंबाचे. या मतदारसंघावर शेवटपर्यंत वर्चस्व ठेवलेल्या उमेश कत्ती यांच्या निधनानंतर आता पहिली निवडणूक होत आहे.
Hukkeri Vidhansabha Constituency
Hukkeri Vidhansabha Constituencysakal
Summary

हुक्केरी विधानसभा मतदारसंघ म्हटले की, राज्यात एकच नाव चर्चेत येते ते कत्ती कुटुंबाचे. या मतदारसंघावर शेवटपर्यंत वर्चस्व ठेवलेल्या उमेश कत्ती यांच्या निधनानंतर आता पहिली निवडणूक होत आहे.

हुक्केरी विधानसभा मतदारसंघ म्हटले की, राज्यात एकच नाव चर्चेत येते ते कत्ती कुटुंबाचे. या मतदारसंघावर शेवटपर्यंत वर्चस्व ठेवलेल्या उमेश कत्ती यांच्या निधनानंतर आता पहिली निवडणूक होत आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष आहे. जनता दल, काँग्रेस, भाजप असे पक्षांतर केले, तरी त्यांचे वर्चस्व येथे कमी झालेले नाही. एक पराभव त्यांना स्वीकारावा लागला असला तरी कर्नाटकात ठळकपणे चर्चेत राहणारे बेळगाव जिल्ह्यातील ते दिग्गज नेते होते. सहा महिन्यात विधानसभेच्या सर्व जागांसाठी निवडणूक होत असल्याने कमी कालावधीमुळे निवडणूक लागली नाही.

हुक्केरी मतदारसंघ १९५७ च्या निवडणुकीत द्विसदस्यीय होता. १९६२ ला हुक्केरी व संकेश्वर असे दोन स्वतंत्र मतदारसंघ झाल्याने दोन आमदारांना दोन मतदारसंघ मिळाले. २००८ पर्यंत संकेश्वर व हुक्केरी हे दोन स्वतंत्र व खुले विधानसभा मतदारसंघ होते, पण २००८ ला मतदारसंघ पुनर्रचनेत संकेश्वर मतदारसंघ गोठवला गेला. यातील काही भाग हुक्केरीला जोडला गेला तर काही भाग नव्या यमकनमर्डीत समाविष्ट केला. हुक्केरी व संकेश्वर मतदारसंघ वेगळे असल्याने हुक्केरीत उमेश कत्ती तर संकेश्वरात ए. बी. पाटील वर्चस्व ठेवून राहिले होते.

हुक्केरी मतदारसंघाचा आजवरचा इतिहास पाहता, येथे व्यक्तीकेंद्रीत राजकारणाचा प्रभाव आहे. उमेश कत्ती हे या भागात वर्चस्व राखून ठेवताना त्यांनी कर्नाटकच्या राजकारणातही सर्व पक्षांत स्थान टिकवून ठेवले होते. उमेश कत्ती यांनी सर्व पक्षांच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळविले असल्याने त्यांच्या राजकारणात हा मैलाचा दगड ठरला आहे. पक्षांतर कित्येकवेळा करूनही त्यांची घोडदौड रोखता आली नाही. एकदा भाजप उमेदवार शशिकांत नाईक यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. कालांतराने तेही भाजपात गेले. २००८ ला उमेश कत्ती हे जनता दलाच्या उमेदवारीवर विजयी झाले. त्यावेळी राज्यात भाजपला सत्तास्थापनेला नऊ आमदारांची गरज होती. अशावेळी भाजपने राज्यात ऑपरेशन कमळ मोहीम राबवली. यामध्ये उमेश कत्ती यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यावेळी राज्यात भाजपच्या येडियुराप्पा यांचे बहुमताचे सरकार सत्तेवर आले.

संकेश्वर शहरातील जनता १९७० ते ८० च्या दशकात पाणी समस्येने त्रस्त झाली होती. उन्हाळ्यात चार महिने येथील हिरण्यकेशी नदी कोरडी पडत होती. पाण्याचा हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रथम मल्हारगौडा पाटील यांनी प्रयत्न केले. त्यांच्या कार्याकाळात हिडकल योजनेला मंजुरी मिळाली. पुढे ए. बी. पाटील यांनी योजना पूर्ण करून घेतली. त्यानंतर उमेश कत्ती यांनी हिडकलमधून थेट पाईपलाईन योजना व २४ तास पाणी योजना कार्यान्वित केली.

हुक्केरी’त चारवेळा मंत्रिपद

हुक्केरी तालुक्यात यापूर्वी दोन, आता एक मतदारसंघ आहे. या मतदारसंघात हुक्केरी मतदारसंघातून दोघे तर संकेश्वर मतदारसंघातून दोघे असे चार मंत्री झाले आहेत. यामध्ये उमेश कत्ती चारवेळा मंत्री झाले. मंत्री असतानाच त्यांचे बंगळूरमध्ये हृदयघाताने निधन झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com