Kasba Bypoll Election : कसब्यात दुपारपर्यंत 'इतके' टक्के मतदान, मतदारांचा निरुत्साह कशामुळे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kasba Bypoll Election

Kasba Bypoll Election : कसब्यात दुपारपर्यंत 'इतके' टक्के मतदान, मतदारांचा निरुत्साह कशामुळे?

पुणेः कसबा विधानसभा मतदार संघात पहिल्या चार तासात केवळ सव्वा आठ टक्के मतदान झाल्यामुळे मतदारांचा पोटनिवडणुकीमधील निरुत्साह दिसून येत आहे. या घटनेला निवडणुक आयोग जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.

मतदार याद्या अद्ययावत केल्या असे सांगितले गेलेले असले तरी यामध्ये मयत मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवाय दुपारपर्यंतही मतदानाची टक्केवारी फारकाही वाढलेली नाही.

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत दुपारपर्यंत केवळ ३० टक्के मतदान झालेलं आहे. कसब्यात ३० टक्के तर चिंचवडमध्ये ३०.५५ टक्के मतदान झालेलं आहे. शेवटच्या टप्प्यात मतदान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी अधिकृत आकडेवारीनंतरच मतदानाची माहिती समोर येईल.

मिळालेल्या माहितीनुसार, अद्ययावत केलेल्या मतदार याद्यांमध्ये मयत मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात आढळली आहेत. तर जिवंत असलेल्या मतदारांची नावं यादीतून गायब आहेत. दोन-तीन केंद्रांवर फिरून नाव आहे का याची चौकशी केली जात आहे. पण नाव सापडत नसल्याने नाईलाजाने मतदान न करता नागरिकांना घरी जावे लागत असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :Pune News