प्रचार संपल्यावर मुख्यमंत्र्यांनी कसब्यात पैसे वाटले, धंगेकरांचा खळबळजनक आरोप Kasba Bypoll Election

कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूकांसाठी रविवार मतदान पार पडलं
Kasba Bypoll Election
Kasba Bypoll Electionesakal

Kasba Bypoll Election 2023: पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूकांसाठी काल (रविवार) मतदान पार पडलं. भाजप आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील या निवडणूकीत उतरले होते.

दरम्यान दोन्ही जागांवर या निवडणूकांना गालबोल लागल्याच्या घटना काल घडल्या मारहाण, पैसै वाटप अशा घटना घडल्या.

दरम्यान आज कसब्यातील मविआचे उमेदवार रविद्र धंगेकर यांनी साम मुलाखत देली त्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Kasba Bypoll Election
NCP News: राष्ट्रवादीला धक्का! माजी आमदाराने जिल्हाध्यक्ष पदाचा दिला राजीनामा | Jagannath Shinde

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात पैसे वाटले आणि ज्या घरात पैसे वाटले ते घरं माझं होतं. पैसे वाटप केल्याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रवीण दरेकर ,चंद्रकांत पाटलांवरही निवडणूक आयोगानं गुन्हा दाखल करावा.

Kasba Bypoll Election
Nana Patole : "तडीपार लोकांना सोबत घेऊन कसबा पेठेत दहशद निर्माण केली" नाना पटोले गरजले

हा अन्याय माझ्यावरचं का? हा पक्षपातीपणा कशासाठी?" असा सवाल रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. तर त्यांनी आपला विजय होणार आहे याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला, ते म्हणाले, मी 15 ते 20 हजार मतांनी निवडून येणार आहे.

भाजपला निवडून येणं शक्य नसल्यान त्यांनी पुण्यात पैसे वाटप केले असा आरोप देखील धंगेकर यांनी केला. मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com