madhya pradesh assembly election 2023
madhya pradesh assembly election 2023Esakal

Congress News : मध्य प्रदेशात काँग्रेसचं हिंदुत्वाचं कार्डही फेल! जनतेनं नाकारली कमलनाथ यांची रणनिती

मध्य प्रदेशात भाजपला बहुमत मिळालं आहे.

मध्य प्रदेशात भाजपने मोठा विजय मिळवला आहे, भाजपच्या वादळापुढे काँग्रेसचा सुपडा साफ झाल्याचे पाहायला मिळाले. या निवडणुकीत भाजपाने जिंकलेल्या जागांचा आकडा 150 च्या वर जात आहे, काँग्रेस सर्वात वाईट कामगिरी करताना दिसत आहे. आता काँग्रेसच्या पराभवाची अनेक कारणे आहेत, शिवराज सिंह यांचा चेहरा आणि लाडली बहना योजना गेम चेंजर ठरली आहे, पण या निवडणुकीत काँग्रेसच्या रणनितीने देखील पक्षाला बुडवले.

मध्य प्रदेश निवडणुकी भाजपच्याच मैदानावर त्यांना पराभूत करण्यासाठी कमलनाथ यांनी रणनीतीआखली होती. त्यामुळे काँग्रेस पक्षाने सॉफ्ट हिंदुत्वावर पूर्ण भर दिला, याला हार्ड हिंदुत्वही म्हटले जाऊ शकते. या निवडणुकीत काँग्रेसच्या जाहीरनाम्यात गाई आणि मंदिर विकासावर विशेष भर देण्यात आला. 2018 च्या निवडणुकीत दिलेली काही आश्वासने देखील पुन्हा एकदा देण्यात आली होती.

या निवडणुकीत कमलनाथ यांच्या रणनीतीनुसार नंदिनी गोधन योजना सुरू करण्याची चर्चा होती. या योजनेअंतर्गत राज्य सरकार दोन रुपये किलो दराने शेण खरेदी करणार होते. त्याचप्रमाणे काँग्रेसने 1000 गोशाळा पुन्हा सुरू करण्याचे आणि गो ग्रास अनुदान वाढविण्याचे आश्वासन दिले होते. इतकेच नाही तर काँग्रेसनेही मंदिराचे राजकारण देखील केलं आणि निवडणुकीच्या हंगामात राम वन गमन पथ लवकरच पूर्ण करण्याची घोषणा करण्यात आली. पक्षाने श्रीलंकेत माता सीतेचे मंदिर बांधण्याची घोषणा केली आणि महंत आणि पुजाऱ्यांना विमा देण्याची घोषणा केली. यासोबतच चित्रकूटमध्ये निषादराजांचा प्रतिमा बसवण्याबाबतही काँग्रेसने आश्वासन दिले होते.

madhya pradesh assembly election 2023
National Navy Day: भारतीय नौदलाचा 'हा' इतिहास तुम्हाला माहित आहे का ?

काँग्रेसने या सगळ्यात आपली सेक्युलर इमेज कुठेतरी सोडून दिल्याचं पाहायला मिळालं. एकेकाळी मुस्लिमांच्या प्रतिनिधित्वाची काळजी घेणाऱ्या काँग्रेसने यावेळी तुष्टीकरणाच्या भीतीने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे एमपीमध्ये सात टक्के मुस्लीम होते, 25 जागांवर त्यांची भूमिका निर्णायक मानली जात होती, पण काँग्रेसने दोनच उमेदवार उभे केले. त्यामुळे या निवडणूकीत काँग्रेसवरही हिंदुत्ववादी विचारसरणीचे वर्चस्व होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पण हिंदुत्वाचा विचार केला तर लोकांचा काँग्रेसपेक्षा भाजपवर जास्त विश्वास असल्याचे निवडणूक निकालावरून दिसून येते.

madhya pradesh assembly election 2023
Ladli Behna Yojana : ‘लाडली बहना’ने तारले पण भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोण?

हिंदू मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेसने अने धर्मगुरू आणि कथा वाचकांकडून कार्यक्रम करवून घेतले. स्वतः कमलनाथ यांनी छिंदवाडा मध्ये बागेश्वर धामच्या धिरेंद्रशास्त्रीचा कार्यक्रम आयोजित केला, महू मध्ये काँग्रेसने जीतू ठाकुर यांनी देखील जया किशोरी यांना कार्यक्रमासाठा आयोजित केलं होतं. मात्र यामुळे निकालावर काही परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले नाही. काँग्रेसचा हा बदलेला चेहरा मतदारांना म्हणावा तेवढा आवडलेला नाही. उलट काँग्रेसच्या सेक्युलर चेहऱ्यालाच तडे गेल्याचे दिसून येत आहे. या सर्वांचा काँग्रेसला फायदा होण्याएवजी नुकसानचं जास्त झाल्याचे बोलले जात आहे.

तर दुसरीकडे भाजपबद्दल बोलायचे झाल्यास जनेता भाजपला पूर्वीपासूनच हिंदुत्ववादी पक्ष मानत आला आहे. भाजप उघडपणे भूमिका घेत आला आहे आणि पक्षातील नेते विचारधार एकदम स्पष्टपणे मांडतात.

त्यामुळे भाजपने मध्य प्रदेशात उपस्थित केलेला राम मंदिराचा. गाईंचा मुद्दा लोकांशी कनेक्ट झाला. भाजप पूर्वीपासून या मुद्द्यांवर भूमिका घेत आला आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या पिचवर देखील भाजला हारवणे काँग्रेसला शक्य झालं नाही. इतकेच नाही तर काँग्रेस असेच भाजपच्या पावलांवर चालत राहिली तर इतर राज्यात देखील काँग्रेसला मोठं नुकसान सहन करावे लागू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com